• Thu. Oct 16th, 2025

मराठी पत्रकार परिषदेच्या उत्तर जिल्हाध्यक्षपदी प्रा. अमोल वैद्य

ByMirror

Dec 7, 2022

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्याचा विस्तार आणि व्याप्ती लक्षात घेऊन मराठी पत्रकार परिषदेने संघटनेच्या सोयीसाठी उत्तर नगर जिल्हा आणि दक्षिण नगर जिल्हा असे दोन भाग केले असून, दोन्हीकडे परिषदेच्या स्वतंत्र शाखा स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर नगर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष म्हणून अकोले येथील पत्रकार प्रा. अमोल वैद्य यांची नियुक्तीची घोषणा परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी केली आहे.


प्रा. अमोल वैद्य हे परिषदेचे विद्यमान जिल्हा प्रसिध्दी प्रमुख होते. ही जबाबदारी अन्य पत्रकारावर सोपविण्यात येत आहे. वैद्य यांनी दोन दिवसात आपली कार्यकारिणी निवडून त्यास परिषदेची मान्यता घेण्याची सूचना करण्यात आली आहे. उत्तर नगरमधील अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव, राहूरी, राहता आदी तालुक्यातील परिषदेचं संघटन मजबूत करण्याची जबाबदारी वैद्य यांच्यावर सोपविण्यात आली आहे.


अमोल वैद्य हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. आजपर्यंत त्यांनी विविध वर्तमानपत्रांत पत्रकार म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारिता, सामाजिक क्षेत्रातील राज्य व जिल्हास्तरीय अनेक महत्त्वाचे पुरस्कारही मिळाले आहेत. अकोले तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरीपदही त्यांनी यशस्वीरित्या सांभाळले आहे. याशिवाय रोटरी क्लब अकोलेचेते संस्थापक अध्यक्ष असून 14 जिल्ह्यांच्या असलेल्या रोटरी डिस्ट्रिकट 3132 च्या पब्लिक इमेजचे चेअरमन पदाची जबाबदारी ही त्यांनी यापूर्वी पार पाडलेली आहे. अकोले तालुक्यातील सुगाव खुर्द ग्रामपंचायतचे सरपंच पदही त्यांनी भूषविले आहे. अकोले महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचे सेक्रेटरी, रोटरी डिस्ट्रिक्टवर ते काम पाहत आहेत. अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या भैरवनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे सह-शिक्षक म्हणून ते सेवेत आहेत.


या नियुक्तीबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम. देशमुख, विश्‍वस्त किरण नाईक, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *