समाजाची नूतन कार्यकारणी जाहीर
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार देवांग कोष्टी समाज अध्यक्षपदी शिवम प्रभाकर भंडारी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. नुकतीच भिंगारला देवांग कोष्टी समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यामध्ये नवीन कार्यकारणी जाहीर करुन भंडारी यांची अध्यक्षपदी नियुक्तीची घोषणा करण्यात आली.
भिंगार मधील देवांग कोष्टी समाजातील ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक घेण्यात आली. शिवम भंडारी यांचे विविध क्षेत्रात सामाजिक कार्य सुरु असून, त्यांचे समाजासाठी असलेले योगदान व कार्य लक्षात घेऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भंडारी यांनी येणार्या काळात समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहून समाजाच्या उज्वल भवितव्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला.
या बैठकीत पुढीलप्रमाणे भिंगार देवांग कोष्टी समाजाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
उपाध्यक्ष- ज्ञानेश्वर फासे, सचिव- अनिल सोले, सहसचिव- नवनाथ सगम, खजिनदार- विजयकुमार भंडारी, सहखजिनदार- गजानन भंडारी, सल्लागार- नवनाथ लोखंडे, कार्यकारणी सदस्य- विठ्ठल लोखंडे, सदीप टेके, गोरक्षनाथ लोखंडे, रमेश बोंदर्डे, उमाकांत असमेर, नारायण वाघुंबरे, विनायक मेहेत्रे, राजेंद्र कुरकुटे, बाळकृष्ण कुमठेकर, शंकर लोखंडे.
