• Mon. Dec 1st, 2025

भिंगारला कोष्टी समाजाच्या वतीने महिला मेळावा उत्साहात

ByMirror

Mar 9, 2023

महिलांनी कौशल्य आत्मसात करुन आत्मनिर्भर होणे काळाची गरज -रेणुका वराडे

अहमदनगर (प्रतिनिधी)- कौशल्यक्षम शिक्षणाने अनेक महिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहून कुटुंबाची प्रगती साधली आहे. महिलांनी कौशल्य आत्मसात करुन आत्मनिर्भर होणे काळाची गरज बनली आहे. महिला आत्मनिर्भर झाल्यास कुटुंब व समाजाची प्रगती साधली जाणार असल्याचे प्रतिपादन रेणुका वराडे यांनी केले.


भिंगार येथे समस्त कोष्टी समाजाच्या वतीने महिलांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी महिलांच्या आरोग्यावर मार्गदर्शन करताना रेणुका वराडे बोलत होत्या. चौंडेश्‍वरी मंदिरात महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या या मेळाव्याप्रसंगी स्त्री रोग व कॅन्सर तज्ञ डॉ. ऋषीकेश पंडित, अध्यक्षा अनिता लोखंडे, सचिव ज्योती उदबत्ते, अनिता सोळसे, अनिता सगम, शिवम भंडारी, विठ्ठलराव लोखंडे, शंकरराव लोखंडे, देविदास कुमठेकर आदींसह सर्व समाजातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


डॉ. ऋषीकेश पंडित म्हणाले की, कॅन्सरने घाबरण्याची गरज नसून, योग्य वेळी उपचार व तपासणी आवश्यक आहे. कॅन्सर प्रथम अवस्थेत तपासल्यास रुग्ण बरे होतात. मात्र याकडे दुर्लक्ष करणारे मृत्यूकडे ओढले जातात. हा आजार संसर्गजन्य नसून, लाईफस्टाईलमुळे निर्माण होणारा आजार आहे. सध्या महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढत असून, त्या दृष्टीने जागृती होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तर कॅन्सरची प्राथमिक लक्षणे ओळखण्याची त्यांनी महिलांना माहिती दिली. प्रास्ताविक ज्योती उदबत्ते यांनी केले. आभर अनिता लोखंडे यांनी मानले. यावेळी उपस्थित महिलांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *