सुमेध मुजुमदार राज्यात नववा तर जिल्ह्यात पहिला
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती व पूर्व माध्यमिक शष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. विद्यार्थ्यांनी शाळेच्या निकालाची उज्ज्वल परंपरा या वर्षीही कायम राखली असून, राज्याच्या व जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत स्थान पटकाविले आहे.

इयत्ता 5 वी च्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 17 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहेत. यामध्ये सुजल सागर घालमे याने जिल्हा गुणवत्ता यादीत 22 वा तर प्रशालेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. इयत्ता 8 वी च्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेचे 20 विद्यार्थी चमकले आहे. यामध्ये सुमेध मुजुमदार हा राज्यात नववा तर जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला आहे.
या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेत संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अशोक मुथा, खजिनदार प्रकाश गांधी, सहकार्यवाह गौरव फिरोदिया, विद्यालयाचे प्राचार्य उल्हास दुगड, उपमुख्याध्यापिका सुषमा चिटमील, पर्यवेक्षक रावसाहेब बाबर, आशा सातपुते आदी उपस्थित होते.
इयत्ता 5 वीच्या विद्यार्थ्यांना अतुल बोरुडे, बाळासाहेब पालवे, वैशाली मेहेर, मनिषा कांबळे व इयत्ता 8 वीच्या विद्यार्थ्यांना प्रगती बेगडे, अतुल पटवा, शिल्पा नगरकर, राजलक्ष्मी कुलकर्णी आदींचे मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या वतीने सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणार्या अध्यापकांचे अभिनंदन करण्यात आले.