अहमदनगर (प्रतिनिधी)- बिग मी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या गुंतवणूक दारांच्या 7.5 कोटींच्या फसवणुकीतील एमपीआयडीच्या गुन्हयातील आरोपीस अहमदनगर जिल्हा न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला.
सन 2020 फंड पे व बिग मी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यामध्ये गुंतवणूकदारांना जास्त परताव्याची आमिष दाखवून 7.5 कोटीची गुंतवणूक करून अनेक गुंतवणूकदारांना परतावा तसेच पैसे परत न देणार्या बिग मी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या डायरेक्टर तसेच मॅनेजरवर महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ डिपॉझिटर्स अॅक्ट व फसवणुकीचा गुन्हा तोफखाना पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणातील तपास हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. यामध्ये तपास पूर्ण होऊन सात आरोपींविरुद्ध विशेष जिल्हा सत्र न्यायालयामध्ये दोषारोप दाखल करण्यात आले. सदर केस मध्ये जुलै 2022 पासून अटक असलेला आरोपी प्रीतम मधुकर शिंदे याने अॅड. सरिता एस. साबळे यांच्या मार्फत जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी होऊन अॅड. साबळे यांनी आरोपींच्या वतीने युक्तीवाद केला. हा युक्तीवाद ग्राह्य धरुन प्रीतम मधुकर शिंदे यास न्यायालयाने जामीन मंजूर केला.
आरोपीच्या वतीने अॅड. सरिता एस. साबळे यांनी अॅड. महेश तवले यांच्या मार्गदर्शनाखाली काम पाहिले. त्यांना अॅड. सतीश गीते व अॅड. निकिता गायकवाड यांनी सहकार्य केले.