• Sat. Sep 20th, 2025

बालवैज्ञानिकांनी दाखवली कल्पनाशक्ती व कौशल्याची चुणूक

ByMirror

Mar 1, 2023

पी.ए. इनामदार शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांनी दिला प्रदुषणमुक्ती, जलबचत व पर्यावरण संवर्धनाचा संदेश

अहमदनगर (प्रतिनिधी)- पी.ए. इनामदार शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेत आयोजित गणित, विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन, जल शुध्दीकरण, पाणी बचत, सौर ऊर्जेचा वापर तर विविध गणितीय सुत्रांचे प्रकल्प सादर करुन उपस्थितांचे लक्ष वेधले. तर प्रदर्शनात सहभागी झालेल्या बालवैज्ञानिकांनी आपल्या विविध प्रकल्पाद्वारे कल्पनाशक्ती व कौशल्याची चुणूक दाखवली.


गणित, विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन अहमदनगर महाविद्यालयाचे भौतिक शास्त्राचे प्राध्यापक डॉ. सोहेल सैय्यद यांच्या हस्ते झाले. यावेळी व्हाईस चेअरमन इंजि. इकबाल सय्यद, प्राचार्य हारुन खान, उप प्राचार्या फरहाना शेख आदींसह आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


या विज्ञान प्रदर्शानास विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग लाभला. प्रास्ताविकात हारुन खान यांनी लहान वयापासूनच विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीस चालना दिल्यास भविष्यात वैज्ञानिक घडतील. विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच शाळेमध्ये नवनवीन उपक्रमांना प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.


प्राध्यापक डॉ. सोहेल सैय्यद म्हणाले की, जिज्ञासू वृत्ती असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दडलेला असतो. विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळत असतो. संशोधनासाठी अनेक संधी उपलब्ध असून, समाजहितासाठी व देशाच्या प्रगतीसाठी वैज्ञानिक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. निरीक्षण व विविध समस्यामधून संशोधकवृत्ती

वाढत असल्याचे ते, म्हणाले.


विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी ज्ञानेंद्रिये, अन्न पिरॅमिड, जलविद्युत, सौर यंत्रणा, हायड्रोलिक जेसीबी, वायरलेस वीज, हृदय मॉडेल, ज्वालामुखीचा उद्रेक, पेरिस्कोप, न्यूटन डिस्क, किडनीचे मॉडेलचे प्रकल्प मांडले होते. विद्यार्थ्यांना मुनजा शेख, समरीन शेख, फरहीन मिर्झा, सानिया शेख, कशफ शेख, जाकीर मोमीन, श्रद्धा आढाव या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *