मशिदीत सर्व धर्मीय आले एकत्र
अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या वतीने रमजाननिमित्त सर्व समाजबांधवांसाठी रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करुन धार्मिक एकतेचा संदेश देण्यात आला. गाव चलो अभियान अंतर्गत मांडवगण (ता. श्रीगोंदा) येथील मशिदमध्ये झालेल्या या कार्यक्रमात सर्व धर्मीयांनी उपस्थित राहून धार्मिक एकतेचे दर्शन घडविले.
प्रारंभी पवित्र कुरानचे पठण करुन रोजा इफ्तारला सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य सुनिल ओव्हळ, माजी जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, मेजर राजू शिंदे, बसपा मांडवगणचे सलीम अत्तार, बाबाजान अत्तार, इब्राहिम अत्तार, बालम अत्तार, रज्जाक शेख, मुन्ना काझी, इब्राहिम इनामदार, अस्लम पठाण, बशीर काझी, रमजान अत्तार, वसिम शेख, नाना पवार, गणेश बागल, संतोष मोरे, तन्मय मोरे, बाळासाहेब मधे, विशाल पवार आदींसह गावातील सर्व समाज बांधव उपस्थित होते.
उमाशंकर यादव म्हणाले की, गाव हा देशाचा आत्मा आहे. गाव सुधारले देशाचा खरा विकास होणार आहे. गावापासून शहरा पर्यंत जातीय ध्रुवीकरण पसरवली जात आहे. जाती-धर्माच्या उतरंडी नष्ट करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनापासून समतेचा विचार घेऊन पक्षाच्या वतीने गाव चलो अभियान सुरु करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

सुनिल ओव्हळ म्हणाले की, शांतता व सुव्यवस्था अबाधित राहिल्यास समाजाचा व देशाचा विकास होणार आहे. मात्र राजकारणासाठी जात-धर्माचा वापर करुन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सत्ताधारी करत आहे. विकासाच्या मुद्दा सोडून एका विशिष्ट समाजाला टार्गेट करुन मतांचे राजकारण केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. मेजर राजू शिंदे यांनी प्रत्येकाला धर्माचा आदर असावा, मात्र धर्मा-धर्मात भांडण लावण्याचे राजकरण हा अधर्म आहे. देश हा लोकशाही मार्गाने घटनेने चालतो, हुकूमशाही प्रस्थापित करणार्यांना शह देण्यासाठी सर्व जाती, धर्माच्या नागरिकांनी शहाण होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांनी येणार्या रमजान सणासाठी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.