तर गरजू दिव्यांगाला औषधाची मदत
संघटनेच्या माध्यमातून दिव्यांगांना आधार देवून त्यांचे प्रश्न सोडविण्याचे कार्य सुरु -अॅड. लक्ष्मण पोकळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने शहरातील दिव्यांग बांधवांना किराणा साहित्य व अन्न-धान्याचे वाटप करण्यात आले. तर एका गरजू दिव्यांगाला औषधे उपलब्ध करुन देण्यात आले. आमदार बच्चू कडू यांच्या प्रेरणेने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
जुनी महापालिका जवळ झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. लक्ष्मण पोकळे, जिल्हा सचिव हमिद शेख, शहराध्यक्ष संदेश रपारिया, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख पोपट शेळके, नगर तालुका महिला अध्यक्षा सरला मोहळकर, जिल्हा समन्वयक राजेंद्र पोकळे, नगर तालुकाध्यक्ष किशोर सूर्यवंशी, संजय पुंड, गितांजली कासार, मुकबधीर संघटनेचे दिपक जाधव, पारनेर तालुकाध्यक्ष भिमाबाई शिर्के, कांचन वखारिया आदी उपस्थित होते.
अॅड. लक्ष्मण पोकळे म्हणाले की, प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या माध्यमातून दिव्यांगांना आधार देवून त्यांचे प्रश्न सोडविण्याचे कार्य सुरु आहे. संघटनेचे आधार स्तंभ असलेले आमदार बच्चू कडू यांच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे. दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालयाच्या प्रमुखपदी त्यांची झालेल्या निवडीमुळे अनेक दिव्यांगांच्या आशा पल्लवीत झाल्या असून, त्यांचे प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हमिद शेख म्हणाले की, प्रहार दिव्यांग क्रांती संघटना दिव्यांगांना प्रवाहात आणण्याचे कार्य करत आहे. दिव्यांग बांधवांचे अनेक प्रश्न सोडविण्यात आले असून, प्रलंबीत प्रश्नावर आमदार बच्चू कडू यांच्या माध्यमातून शासनस्तरावर पाठपुरावा सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमास उपस्थित असलेल्या दिव्यांग बांधवांना किराणा साहित्य व अन्न-धान्याची मदत देण्यात आली. तर मागील दीड वर्षापासून विजय गिते या दिव्यांग व्यक्तीस पॅरॅलिसिवर सुरु असलेल्या उपचारासाठी औषधांची मदत सुरु असून, त्यांना देखील औषधे देण्यात आले. दिव्यांगांना किराणा साहित्याची संजय बाफना यांच्याकडून मदत मिळाली. कोरोना काळापासून संघटनेने मोठा आधार देण्याचे काम केले. तर विविध प्रश्न एका कुटुंबाप्रमाणे सोडविले जात असल्याची भावना उपस्थित दिव्यांगांनी व्यक्त केली.