त्रिदशक पूर्तीनिमित्त 7 ते 30 एप्रिल दरम्यान होणार विविध आरोग्य तपासणी
नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील पाटील हॉस्पिटलच्या त्रिदशक पूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन जागतिक आरोग्य दिनी वीर पत्नी रेवाताई कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पाटील हॉस्पिटल व मोहरकर आयसीयूचे डॉ. विजय पाटील (अस्थिरोग तज्ञ), डॉ. शरद मोहरकर (मधुमेह तज्ञ), डॉ. रूपाली मोहरकर (पॅथॉलॉजिस्ट), डॉ. प्राची पाटील व डॉ. प्राजक्ता झावरे (दंतरोग तज्ञ) उपस्थित होते.
कोठी चौक, स्टेशन रोड येथील पाटील हॉस्पिटलला रुग्ण सेवेस प्रारंभ होवून नुकतेच तीस वर्ष पूर्ण झाले आहेत व मोहारकर आयसीयूला एक वर्ष पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर 7 ते 30 एप्रिल दरम्यान 24 दिवस विविध आरोग्य शिबिर होणार आहे. यामध्ये अस्थीरोग विभाग, मेडिसिन विभाग, दंत रोग विभाग अंतर्गत विविध आरोग्य शिबिर घेण्यात येणार आहेत. या शिबिरामध्ये मेडिसिन विभागांतर्गत हृदयरोग तपासणी, मधुमेह तपासणी, ब्लड प्रेशर, शुगर, हिमोग्लोबिन, अस्थमा, पोटांचे विकार तसेच अस्थिरोग विभागांतर्गत गुडघे बदली, खुबा बदली या शस्त्रक्रिया माफक दरात केल्या जाणार आहेत. दंतरोग विभागांतर्गत वेडेवाकडे दात सरळ करणे, दातांना कवळी बसवणे इतर दंतरोग तपासणी व त्याचे उपचार माफक दरात केले जाणार आहेत. या सर्व आजारांच्या निदानासाठी लागणार्या रक्त-लघवी तपासणी सवलतीच्या दारात केल्या जाणार आहेत.
या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन पाटील हॉस्पिटल व मोहरकर आयसीयूच्या प्रशासक अंजली वामन यांनी केले. शिबिरासाठी नावनोंदणी व अधिमाहितीसाठी गोरक्ष जाधव 9970737637 यांच्याशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.