• Wed. Oct 15th, 2025

नेप्तीत महिला मेळाव्यात बचत गटातील महिलांना कर्ज वाटप

ByMirror

Sep 29, 2022

युवक युवती उद्योग क्षेत्राकडे वळाल्यास बेरोजगारीचा प्रश्‍न सुटणार -राजाराम गायकवाड

अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथे व्यवसाय मार्गदर्शन व महिला मेळावा घेण्यात आला मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यास पंचक्रोशीतील युवकांसह महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. तर बचत गटातील महिलांना विविध व्यवसायासाठी कर्ज वाटप करण्यात आले.


शहीद भगतसिंह यांच्या जयंती दिनानिमित्त घेण्यात आलेल्या या मेळाव्याचे प्रारंभ भगतसिंह यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आत्मा प्रकल्पाचे संचालक राजाराम गायकवाड, अभियान व्यवस्थापक पंढरीनाथ ठाणगे, अभियान व्यवस्थापक बाळासाहेब सरोदे, अभियान व्यवस्थापक ज्ञानेश्‍वर गव्हाणे, महाराष्ट्र उद्योजकता विकास मंडळ (एमसीइडी) प्रकल्प समन्वयक रविराज भालेराव, नगरसेवक मनोज कोतकर, तेजस्विनी महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा अश्‍विनी बेल्हेकर, सचिव भारती राऊत, कृषि सखी अरुणा जपकर, सीआरपी वंदना नेमाने उपस्थित होते.


राजाराम गायकवाड म्हणाले की, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेतंर्गत युवक-युवतींना रोजगाराची मोठी संधी आहे. युवक उद्योग क्षेत्राकडे वळाल्यास अनेकांना रोजगार मिळून बेरोजगारीचा प्रश्‍न सुटणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर आत्मा प्रकल्पाअंतर्गत असणारे विविध योजना, शासन बँक कर्जावर 35 टक्के किंवा जास्तीतजास्त 1 लाख रुपया पर्यंत सबसिडी असल्याची माहिती दिली.


बाळासाहेब सरोदे म्हणाले की, उमेद अभियानाच्या माध्यमातून बचत गटाची मोठी चळवळ उभारली गेली आहे. शासन त्यासाठी सर्वतोपरी मदत करत असल्याचे त्यांनी नमूद केले. तर बचत गटांना प्रत्येकी 15 हजार रुपये, खेळते भांडवल एकूण 2 लाख 40 हजार रूपये मंजूर झाले असून, निधी उपलब्ध झाल्यानंतर संबंधित बचत गटाच्या खात्यांवर वर्ग करण्यात येतील असे त्यांनी सांगितले. ज्ञानेश्‍वर गव्हाणे यांनी तेजस्विनी महिला ग्राम संघ गावात स्थापन झाले असून, या अभियाना अंतर्गत बचत गटांना निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे स्पष्ट केले. रविराज भालेराव यांनी विविध शासकीय योजना तसेच सबसिडी योजनांची माहिती दिली.


नगरसेवक मनोज कोतकर यांनी गावातील तरुण युवकांनी सत्कारात्मक बदल घडविण्यासाठी एकत्र येऊन गावाचा विकास साधण्याचे आवाहन केले. यावेळी महाराष्ट्र राज्य जीवन्नोती अभियानांतर्गत गावात 36 बचत गटाची स्थापना झाली असून, आज पर्यंत 13 गटांना 26 लाख 40 हजार रुपये कर्ज एचडीएफसी बँक मार्फत वाटप करण्यात आले आहे. कार्यक्रमप्रसंगी गौरी बचत गटाला 2 लाख 10 हजार कर्ज मान्यवराच्या हस्ते प्रदान करण्यात आले. कोरोना काळात ग्रामीण भागात जीवाची पर्वा न करता काम केलेले डॉक्टर, आशा सेविका यांना गौरव पत्र देऊन सन्मान करण्यात आला.


प्रास्ताविकात नानासाहेब बोल्हेकर यांनी नवे पर्व, युवा सर्व या संकल्पनेतून गावात एक वर्षापूर्वी बचत गटाची चळवळ सुरु करण्यात आली होती. या चळवळीत अनेक महिला जोडल्या गेल्या आहे. व्यावसायिक मार्गदर्शन शिबिरातून युवक व महिलांच्या हाताला काम मिळणार आहे. गावातील तरुणांनी एकत्र आल्यास मोठा बदल घडून गावाचा विकास साधला जाणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी विलास चौरे, रामदास फुले शुभम चौरे, जिजाबापू होळकर, महादेव होळकर, महेंद्र चौगुले, संदीप फुले, सचिन जपकर, भाऊ कोतकर, विकास पवार, तुषार फुले, दादा बेल्हेकर, डॉ. शिरसाठ, भानुदास फुले, शशी होळकर, विनायक बेल्हेकर, आसिफ,सय्यद, सुरज पवार, जमीर सय्यद, बाळासाहेब होळकर, रावसाहेब कर्पे, सोमनाथ जपकर, अमोल चौगुले, योगेश कानडे, विकास जपकर, प्रकाश पवार, संकेत गाडेकर आदीसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या . कार्यक्रमाचे आयोजन गावातील युवा वर्ग तेजस्विनी महिला ग्राम संघ यांनी केले.सूत्रसंचालन शिवव्याख्याते कीर्तनकार आकाश महाराज फुले यांनी केले. आभार प्रदर्शन शिवाजी खामकार यांनी मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *