गावासाठी जलजीवन योजना तातडीने पूर्ण करणार -जपकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) गावच्या पाणीपुरवठा समितीच्या अध्यक्षपदी सौरभ जपकर यांची निवड करण्यात आली. माजी सरपंच विठ्ठलराव जपकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली.

यावेळी माजी सरपंच विठ्ठलराव जपकर, विद्यमान सरपंच सविता जपकर, उपसरपंच संजय जपकर, संजय अशोक जपकर, फारुख सय्यद, अनिता चौघुले, संभाजी गडाख, एकनाथ जपकर, विमल होळकर, सोनाली जपकर, माजी पंचायत समिती सदस्य देवा होले, संचालक वसंत पवार, श्रीपतराव जपकर, मच्छिंद्र जपकर, पांडुरंग जपकर, सयाजी जपकर, प्रा. एकनाथ होले, दादू चौगुले, शिवाजी होळकर, मल्हारी कांडेकर, मच्छिंद्र कांडेकर, दिलीप होळकर, बाबासाहेब जाधव, भरत कांडेकर, विलास जपकर, सुधाकर कदम, जालिंदर शिंदे, रामदास फुले, रघुनाथ होळकर, नंदू जाधव, कारभारी जपकर, विजय जपकर, सतिष जपकर, आभिजीत जपकर, अतुल गवारे, राहुल गवारे, राजू गवारे, गोरख जपकर, सुनील पवार, बहिरू जपकर, नवशाद शेख, बाबु होळकर, संतोष चहाळ आदींसह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
विठ्ठलराव जपकर यांनी नेप्ती गावातील लोकांना पिण्याच्या पाण्याची अडचण येणार नाही व आरोग्यासाठी स्वच्छता राहणार असल्याची शाश्वती दिली. सरपंच व उपसरपंच यांच्यासह पाणीपुरवठा समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेले सौरभ जपकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
सौरभ जपकर यांनी सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, गावाला जे पंधरा दिवसाआड पाणी यायचे आता चार दिवसाला पाणी देण्याचे काम केले जाणार आहे. ज्यांना नळ कनेक्शन नाही, त्यांना तातडीने कनेक्शन देण्याचे काम केले जाणार आहे. मागील प्रमाणे कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही. गावांसाठी लाभदायी जलजीवन योजना तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
सरपंच जपकर यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शासनाच्या सर्व योजनांचा लाभ नागरिकाना मिळवून दिला जाणार आहे. गाव विकासासाठी निर्णय घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
