शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यास प्रयत्नशील राहणार -पूंड
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या स्वीकृत संचालकपदी नुकतीच संजय बाबुराव पूंड यांची नियुक्ती करण्यात आली. चेअरमन अंशाबापू फलके यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या बैठकित पूंड यांची नियुक्तीची घोषणा झाली.
स्वीकृत संचालकपदी निवड झाल्याबद्दल पूंड यांचा सोसायटी व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. पूंड यांनी गावातील हनुमान मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी अकरा हजार एकशे अकरा रुपये मदत दिली. तसेच आशा शिवाजी जाधव यांची देखील स्वीकृत संचालकपदी निवड झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.
संजय पुंड हे प्रहार दिव्यांग संस्थेचे जिल्हा पदाधिकारी असून, त्यांचे संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरु आहे. त्यांनी अनेक दिव्यांगांचे प्रश्न सोडविण्याचे कार्य करत आहे. या निवडीबद्दल प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. सोसायटीच्या माध्यमातून शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यास प्रयत्नशील राहणार असल्याचे पूंड यांनी म्हटले आहे.