राजकारण विकास कामाच्या आड येता कामा नये -आ. निलेश लंके
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने पाझर तलाव दुरुस्ती कामाचे उद्घाटन आमदार निलेश लंके यांच्या हस्ते झाले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य पै. नाना साहेब डोंगरे, माजी सरपंच साहेबराव बोडखे, माजी मुख्याध्यापक किसन वाबळे, गोकुळ जाधव, डॉ. विजय जाधव, अरुण फलके, भरत बोडखे, प्रमोद जाधव, अतुल जाधव, विजय जाधव, सुनील जाधव, रावसाहेब जाधव, दत्तात्रय जाधव, जलसंधारण अधिकारी मुक्ताजी शेळके, कॉन्ट्रॅक्टर राम वाळके, शिवाजी होळकर, योगेश जाधव, अजित जाधव, अतुल फलके, नवनाथ हारदे, भाऊसाहेब जाधव, राम जाधव, कैलास जाधव, अंकुश शिंदे, नामदेव खळदकर, अजय ठाणगे, संदीप खळदकर, पिंटू वैरळ, दीपक गायकवाड, पिंटू जाधव आदी उपस्थित होते.
गावातील पाझर तलाव क्रमांक एक मध्ये मोठी गळती असल्याने पाणी साठवण क्षमता घटली होती. पावसाचे अडविलेले पाणी अधिक काळावधी पर्यंत थांबत नव्हते. गावातील हा सर्वात मोठा पाझर तलाव असून, शेतकर्यांना त्याचा लाभ मिळण्यासाठी दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे.
आमदार निलेश लंके म्हणाले की, गावाच्या विकासात्मक कामासाठी ग्रामस्थांचे सहकार्य अपेक्षित आहे. राजकारण विकास कामाच्या आड येता कामा नये, यामुळे चांगले काम देखील मागे पडतात. गावाचा विकास खुंटतो. यासाठी जागरुक ग्रामस्थांनी विकासात्मक कार्याला चालना देण्याचे काम केले पाहिजे. पाणीदार बनलेल्या गावाचा विकास झपाट्याने साधला जाणार आहे. तर पाझर तलावाचा फायदा गावातील शेतकर्यांना निश्चितच होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. गावातील पाझर तलावांचे पुनरुज्जीवन झाल्यास गावे सुजलाम सुफलाम होणार आहे. त्याचा फायदा परिसरातील विहिरींना होणार असून, गाव टँकरमुक्त होण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.