कृत्रिम जलकुंडात मुर्ती विसर्जित
पाण्याचे स्त्रोत ही गावाची संपत्ती असून, ते चांगले ठेवणे प्रत्येकाची जबाबदारी -पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे नेहरु युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने पर्यावरणपूरक पध्दतीने उत्साहपुर्ण वातावरणात लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या! चा गजर करीत शाडूच्या मातीची गणेशमूर्ती कृत्रिम जलकुंडात विसर्जित करण्यात आली. तसेच संस्थेच्या वतीने गावात जल प्रदूषण टाळण्यासाठी घरच्या घरी जलकुंडात गणेश मुर्त्यांचे विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले.

शुक्रवारी (दि.9 सप्टेंबर) सकाळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे व सचिव मंदाताई डोंगरे यांच्या हस्ते उत्थापन पूजा झाली. यावेळी युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, सोमा डोंगरे, कृष्णा डोंगरे, अक्षय पवार, ऋषी डोंगरे, जनाबाई शिंदे, रोहन डोंगरे, कार्तिक डोंगरे आदी उपस्थित होते.
पाण्याचे स्त्रोत ही गावाची संपत्ती असून, ते चांगले ठेवणे प्रत्येक ग्रामस्थांची जबाबदारी आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्या विहीर, बारव आदी ठिकाणी विसर्जित केल्याने मोठ्या प्रमाणात जल प्रदूषण होते. हे जलसाठे दूषित करण्याऐवजी लाडक्या बाप्पाची पर्यावरणपूरक शाडूच्या मातीची गणेश मुर्ती कृत्रिम जलकुंडात विसर्जित करणे काळाची गरज असल्याची भावना पै.नाना डोंगरे यांनी व्यक्त केली.
या गणेशोत्सवात संस्थेच्या वतीने मतदार जागृती व पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपण करण्यात आले. तर व्यसनमुक्तीच्या जनजागृतीसाठी चित्रप्रदर्शन भरविण्यात आले होते. या उपक्रमासाठी नेहरु युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात व जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे, विशाल गर्जे, दिपाली बोडखे, रमेश गाडगे यांचे मार्गदर्शन लाभले.

