तर महाराष्ट्र भूषण गौरव पुरस्काराचे वितरण
अहमदनगर (प्रतिनिधी)- निंबोडी (ता. नगर) येथे जय मल्हार फाउंडेशन आणि जय मल्हार आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलच्या वतीने बुधवारी (दि.15 मार्च) संध्याकाळी महाराष्ट्रातील नामवंत कुस्तीगीरांना महाराष्ट्र भूषण गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यातील नामवंत मल्ल उपस्थित राहणार असल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष वस्ताद पै. भाऊसाहेब धावडे यांनी दिली.
हा सोहळा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, राजकीय पुढारी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रंगणार असून, या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच यावेळी सामाजिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक, वैद्यकीय, शैक्षणिक, कृषी, उद्योग, व्यापार, कला व धार्मिक अशा क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा पुरस्काराने सन्मान होणार आहे.
