• Thu. Jan 22nd, 2026

नागापूर एमआयडीसी स्मशानभूमीत दारुड्यांकडून महिलेचा विनयभंग

ByMirror

Aug 13, 2023

मारहाण करुन महिलेला जीवे मारण्याची धमकी; तिघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर (प्रतिनिधी)- नागापूर एमआयडीसी येथील स्मशानभूमीत दारु पित बसलेल्या तीन इसमांनी शनिवारी (दि.12 ऑगस्ट) सरपन आणण्यासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग करुन तिला मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला विशाल कळकुंबे, योगेश शिंगाडे, अभिजीत गायकवाड (तिन्ही रा. नागापूर एमायडिसी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नागापूर एमआयडीसी येथे एका हॉटेलचे सरपन आणण्यासाठी महिला आपल्या मुलीसह स्मशानभूमीत असलेल्या पत्र्याच्या शेड मध्ये गेली होती. यावेळी तेथे दारु पिणारे तिन्ही आरोपींनी महिलेला शिवीगाळ केली. त्यापैकी योगेश शिंगाडे याने लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तर तिघांनी मिळून महिलेला खाली पाडून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिल्याचे महिलेने फिर्यादीत म्हंटले आहे. सदर महिलेच्या फिर्यादीवरुन तिन्ही आरोपींवर भा.द.वि. कलम 354, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *