बहुजन समाज पार्टीचे आयुक्तांना निवेदन
महानगरपालिकेत नामकरणाचा ठराव घेण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील पंम्पींग स्टेशन रोड ते धर्माधिकारी मळा येथील चौकास फुले, शाहू, आंबेडकर चौक नाव देण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी बसपाचे शहराध्यक्ष संतोष जाधव, शहर प्रभारी संजय डहाणे, शहर उपाध्यक्ष सिध्दार्थ पाटोळे, सामाजिक कार्यकर्ते सुरज कांबळे, मनोज भिंगारदिवे, प्रकाश भुतकर आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

सावेडी येथील पंम्पींग स्टेशन रोड ते धर्माधिकारी मळा या परिसरात फुले, शाहू, आंबेडकर यांना मानणारा मोठा समाजवर्ग आहे. या महापुरुषांचा आदर्श व त्यांच्या विचारांची प्रेरणा नागरिकांना मिळण्यासाठी या रस्त्यावरील चौकास फुले, शाहू, आंबेडकर चौक नाव देण्याचे निवेदनात म्हंटले आहे.
या चौकाच्या नामकरणासाठी महानगरपालिकेच्या सभेत ठराव घेऊन अधिकृतपणे फुले, शाहू, आंबेडकर चौक नाव देण्याची मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने बहुजन समाज पार्टीने केली आहे. मागणीच्या निवेदनावर स्थानिक नागरिकांच्या स्वाक्षर्या आहेत.
