• Tue. Jul 1st, 2025

दिव्यांग कर्मचार्‍यांच्या हिताचे निर्णय घेणार्‍यांना देणार पाठींबा

ByMirror

Oct 11, 2022

प्राथमिक शिक्षक बॅक निवडणुकीत येणार रंगत

महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी, अधिकारी संघटनेचे राज्य सहकोषाध्यक्ष संतोष सरवदे यांची माहिती

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर प्राथमिक शिक्षक बॅकेच्या राजकारणात आता नवीन वळण मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. बॅकेची शताब्दी पुर्ण झाली तरी, दिव्यांग शिक्षकांना कायम दुय्यम दर्जाची वागणुक देवून कोणत्याही पॅनलने दिव्यांगांना पुरेसे प्रतिनिधीत्व दिलेले नाही. तसेच दिव्यांग कर्मचार्‍यांना कोणत्याही प्रकारच्या विशेष सुविधा देण्यात आलेल्या नाही. यामुळे जे मंडळ बँकेमध्ये सर्व सुविधासह दिव्यांग कर्मचार्‍यांना स्वीकृत संचालक म्हणून पुरेसे प्रतिनिधित्व देईल, त्याच मंडळाला महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी, अधिकारी संघटना जाहिर पाठिंबा देईल असे संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष संतोष सरवदे यांनी प्रसीध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.


जिल्ह्यात एकुण 387 दिव्यांग शिक्षक कार्यरत असून, दिव्यांग शिक्षकांची मते हे निर्णायक मते म्हणून समजली जातात. दिव्यांग शिक्षकांना कायम दुय्यम वागणुक मिळत असल्याने संघटनेच्या वतीने सर्व अडचणीवर मार्ग काढण्यासाठी बैठक घेऊन संघटनेने घेतलेल्या निर्णयाचे सर्व दिव्यांग शिक्षकांनी एकमुखाने सहमती दर्शवली आहे. यावेळी दिव्यांगांचे हित पाहणार्‍या पॅनलला जाहीर पाठिंबा दिला जाणार असल्याचे एकमताने जाहीर करण्यात आले आहे.


अभी नही, तो कभी नही… हा मुलमंत्र संघटनेने घेतलेला असल्याचे संघटनेचे संतोष सरवदे यांनी स्पष्ट केले आहे. या बैठकीसाठी संघटनेचे जिल्हा सचिव पोपट धामणे, जिल्हा कार्याध्यक्ष राजू आव्हाड, अनिल ओव्हळं, नासिर सय्यद, उध्दव थोरात, रमेश सुपेकर, जयकिसन वाघ पाटील, वडीतके, बालाजी चव्हाण, सुनिल जाधव, सुभाष फसले, प्रविण एडके, जगधने सर, किरण माने, देवढे सर, चरणसिंग काकरवाल, निलेश कांबळे, राजेद्र औटी, सुनिल जगधने, रोहीणी लगड, राजाबाई कांबळे, जपकर मॅडम, सुमन अलमले आदींसह सर्व कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *