भाग्यवान विजेत्यास मोपेड बाईकचे बक्षिस
अहमदनगर (प्रतिनिधी)- दिवाळी व पाडव्यानिमित्त दहिवाळ सराफ खरवंडीकर दालनात ग्राहकांसाठी सोने-चांदीच्या खरेदीवर बक्षिसांची लयलूट ऑफर ठेवण्यात आली असून, भाग्यवान विजेत्यास मोपेड बाईकचे बक्षिस ठेवण्यात आले असल्याची माहिती संचालक नवनाथभाऊ दहिवाळ, सचिन दहिवाळ व नितीन दहिवाळ यांनी दिली.
पाच हजार रुपये पुढील खरेदीवर ग्राहकांना लकी ड्रॉ कुपन दिले जाणार आहे. या कुपनचे सोडत पध्दतीने भाग्यवान विजेत्यांची बक्षिसांसाठी निवड केली जाणार आहे. दहिवाळ सराफच्या नवनागापूर, पाईपलाइन रोड, खरवंडी (ता. पाथर्डी) व धनकवडी (जि. पुणे) या शाखेत ही स्किम सुरु आहे. दहिवाळ सराफ येथे हिरे, मोतीचे दागिने, विविध दागिन्यांचे आकर्षक डिजाईन, राशींचे खडे, बीआयएस हॉलमार्क प्रमाणित बिगर घटीचे दागिने उपलब्ध आहे.

दागिन्यांच्या घडणवळणीवर 2 टक्के पासून पुढे सर्वात कमी मजुरी ठेवण्यात आलेली आहे. तसेच सुवर्ण संचय योजनेतंर्गत सर्वसामान्यांना सोने खरेदीची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दरमहा गुंतवणूक करुन शेवटचा हप्ता दहिवाळ सराफच्या वतीने भरुन एकूण रकमेचे दागिने खरेदी करता येणार असल्याचे म्हंटले आहे.
