• Sat. Mar 15th, 2025

त्या माजी नगरसेवकाचे अनाधिकृत तीन मजली इमारत होणार जमीनदोस्त

ByMirror

Oct 12, 2022

उपायुक्तांचे आदेश

अतिक्रमण असतानाही 15 वर्षे राहिले नगरसेवक

अहमदनगर (प्रतिनिधी)- पालिका कर्मचारी तसेच माजी नगरसेवक असलेल्या मुदगल कुटुंबियांचे सर्व बांधकाम अतिक्रमण व अनाधिकृत ठरवून ते पाडण्याचा आदेश महानगरपालिकेच्या उपायुक्तांनी दिला आहे. या अतिक्रमण विरोधातील तक्रारदार अ‍ॅड. गजेंद्र दांगट यांच्या लढ्याला अखेर यश आले आहे.
पालिका कर्मचारी बाबू मुदगल व मुदगल कुटुंबीय यांनी सि.स. नं. 7499 आणि 6052 या जागेवर कोणतीही परवानगी न घेता तीन मजली आरसीसी बांधकाम केले. या इमारती मध्ये त्यांनी अवैध रित्या भाडेकरी टाकले होते. तर महापालिकेची मोठ्या प्रमाणात घरपट्टी बुडवून त्यापुढील येण्या-जाण्याच्या रस्त्यात मोठ्या आकाराचा ओटा बांधून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याची तक्रार अ‍ॅड. गजेंद्र दांगट यांनी महानगरपालिका कडे केली होती.

याप्रकरणी मनपा उपायुक्त यांच्याकडे झालेल्या सुनावणी मध्ये मुदगल कुटुंबीयांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम केल्याचे सिद्ध झाले. मुदगल कुटुंबीयांनी स्वतः हून सर्व बांधकाम काढून घ्यावे, अन्यथा महानगरपालिके मार्फत पाडण्यात येईल. यासाठी झालेला खर्च वसूल करण्यात येईल, अशा आदेश उपायुक्तांनी दिला आहे. परंतु बाबू मुदगल हा पालिका कर्मचारी असल्याने व त्याच्या घरात 15 वर्ष नगरसेवक पद राहिले असल्याने आता पालिका कारवाई करेल का नाही? नगरकरांसाठी उत्सुकतेचा विषय राहणार आहे.

पालिका कर्मचारी आणि माजी नगरसेवक असलेल्या बाबू मुदगल कुटुंबीयांना पालिकेतर्फे विशेष सवलत देण्यात आली आहे. गरिबांच्या टपर्‍या लगेच काढल्या जातात. परंतु दिवसाढवळ्या अतिक्रमण करुन महापालिकेची फसवणुक करणार्‍यांना जावई सारखी वागणुक दिली जात आहे. भूमाफिया मुदगल परिवाराने आणखी एका प्रकरणात कल्याण रोडवर पालिका ओपन स्पेस तसेच महामार्गावरील जागा बळकावून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. तर पत्र्याचे शेड टाकले आहे. यातून त्यांना लाखो रुपयाचे उत्पन्न मिळत आहे. या प्रकरणी तहसीलदार यांच्याकडे सुनावणी सुरु आहे. इतके मोठे अतिक्रमण असतानाही मुदगल परिवारातील व्यक्ती 15 वर्ष नगरसेवक होती, यासंबंधी त्यांना पाठीशी घालणार्‍या सर्व अधिकारी कर्मचारी यांचे विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची शासनाकडे मागणी करणार आहे. -अ‍ॅड. गजेंद्र दांगट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *