शहरात विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
अहमदनगर (प्रतिनिधी)- पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली. जयंतीनिमित्त शहरात विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या बैठकीत जयंती उत्सव समितीची स्थापना करुन जयंती कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकप्रसंगी अक्षय बोरुडे, तेजस गायकवाड, शोभाताई गाडे, स्वप्निल भिंगारदिवे, मिरा गवळी, महेमुदा पठाण, रेखा डोळस, हिरा भिंगारदिवे, संगीता बार्वेकर, रेखा साळवे, रंजना भिंगारदिवे, सुनिता भिंगारदिवे, राधा पाटोळे, अबूबखर शेख, अमोल आडबले, शहबाज शेख, आय्युब शेख, सिद्धार्थ राजगुरू, रामभाऊ आजबे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सोमा शिंदे, उपाध्यक्षपदी विशाल गायकवाड, कार्याध्यक्षपदी किरण जाधव, सचिवपदी गौतमीताई भिंगारदिवे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या अल्पसंख्याक आघाडीच्या युवक शहराध्यक्षपदी शाहीद शेख यांची निवड करुन त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 1 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान साजरी केली जाणार आहे. 1 एप्रिलला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त अहमदनगर जिल्हा रुग्णालयात फळ वाटप करुन जयंती उत्सव सोहळ्याच्या कार्यक्रमाचे प्रारंभ होणार आहे. तसेच शहरात विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी शहरातून भव्य मिरवणुक काढण्यात येणार असून, यामध्ये बाबासाहेबांच्या जीवन चरित्रावर देखाव्याचे विशेष आकर्षण राहणार आहे. या जयंती उत्सव सोहळ्यासाठी प्रा. जयंत गायकवाड, शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, संपर्क प्रमुख सचिन जाधव, उद्योजक लॉरेन्स भैय्या स्वामी, नितीन कसबेकर, सुनील क्षेत्रे, महेश भोसले, किरण गायकवाड, सुरेश भिंगारदिवे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.