अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय ज्ञानवर्धिनी स्पर्धा परीक्षेत नगर तालुक्यातील श्रीराम विद्यालय राळेगण विद्यालयाची इयत्ता सहावीची विद्यार्थिनी श्रेयशी सुधीर भापकर व तेजस्विनी मारुती पिंपळे यांनी 300 पैकी 298 गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. तर विद्यालयातील इयत्ता सातवीचे विद्यार्थी नवनाथ शामकांत भापकर, ऋतुजा बापू गायकवाड व आर्या विलास साळवे यांनी ज्ञानवर्धिनी परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे.
ज्ञानवर्धिनी ही स्कॉलरशीपच्या धर्तीवर संस्थेमार्फत राबविण्यात येणारी स्पर्धा परीक्षा असून, संस्थेतील विद्यार्थ्यां बरोबरच इतर संस्थेतील विद्यार्थी या परीक्षेला बसतात. गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना कै. भिवराबाई दरे यांच्या स्मरणार्थ संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र दरे प्रत्येक वर्षी एक हजार रुपये गुणवत्ता शिष्यवृत्ती देत असतात. या विद्यार्थ्यांना राजश्री जाधव, राजेंद्र कोतकर, संजय भापकर, हरीभाऊ दरेकर, सुजय झेंडे, बाळासाहेब पिंपळे यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे, उपाध्यक्ष रा.ह. दरे, सचिव जी.डी. खानदेशे, सहसचिव ॲड. विश्वासराव आठरे पाटील, खजिनदार डॉ. विवेक भापकर, विश्वस्त मुकेशदादा मुळे, शाळेच्या मुख्याध्यापिका तारका भापकर, प्रभारी मुख्याध्यापक विजय जाधव, निळकंठ मुळे, रामदास साबळे, विशाल शेलार तसेच सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.