• Sun. Mar 16th, 2025

जिल्हा केमिस्ट असोसिएशनने केला गुणवंतांचा सत्कार

ByMirror

Jun 20, 2023

जीवनात ध्येय असल्याशिवाय यश प्राप्ती नाही -संजय कळमकर

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कै.डॉ. आर.जी. सोमाणी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ केमिस्ट परिवारातील इयत्ता दहावी व बारावी बोर्डासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणार्‍या गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा सावेडी येथील श्रध्दा हॉटेलमध्ये रंगला होता.


कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक संजय कळमकर व महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेचे माजी संचालक प्रमोद सोळंकी यांच्यासह जिल्हा केमिस्ट संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता गाडळकर, सचिव आबासाहेब बेद्रे, शहर संघटनेचे भरत सुपेकर, सचिव मनिष सोमाणी, खजिनदार मनोज खेडकर, मनीषा आठरे, अमित धाडगे, आशुतोष कुकडे, रुपेश भंडारी, महेश अनमल, राजेंद्र बेद्रे, संकेत गुंदेचा, महेंद्र अनमल, अनिल गांधी, अभय गुगळे, संजय वाव्हळ, ज्ञानेश्‍वर पठारे, नितीन सातपुते, अभिजित गांगर्डे, संदीप डहाळे, संदिप कोकाटे, अनिल क्षिरसागर, बोरा, विजय कर्पे, गौतम भंडारी, संपत लंके, नवनीत मुनोत, राजेंद्र बिहाणी, नंदकुमार ठुबे, कमलेश गुंदेचा, सनिल सुरवसे, सचिन गायकवाड, अविराज भांड, प्रसाद तनपुरे, अविनाश मेहेर, श्रीनिवास बोडखे आदींसह जिल्हा व शहर कार्यकारणीचे सदस्य, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अमित धाडगे उपस्थित पाहुण्यांसह विद्यार्थी व पालकांचे स्वागत केले. प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष दत्ता गाडळकर यांनी औषधांच्या रुपाने केमिस्ट बांधव शारीरिक स्वास्थ्य जपण्याचे काम करत असताना, सामाजिक स्वास्थ्यासाठी देखील आपले योगदान देत आहे. समाजातील गुणवंतांचा सन्मान करुन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले.


ज्येष्ठ साहित्यिक संजय कळमकर यांनी जीवनात ध्येय असल्याशिवाय यश प्राप्ती होणार नाही. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्‍चित करण्याची गरज असल्याचे सांगून, यशस्वी जीवनाचा कानमंत्र सांगितला. प्रमोद सोळंकी यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अशोक बलदोटा, मनोज इंगळे, योगेश खरपुडे व मनिष सोमाणी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तर उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आभार जिल्हा सचिव आबासाहेब बेद्रे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *