सामाजिक कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय कमिटीवर काम करण्याची संधी
अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष जेऊर बायजाबाई (ता. नगर) येथील ह.भ.प. रोहिदास महाराज जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. शहरात जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे एक दिवसीय शिबिरात राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय सल्लागार अॅड. गजानन ठाकरे, महाप्रदेश अध्यक्ष राम घरत, राज्य प्रभारी अध्यक्ष ह.भ.प. वाल्मिक महाराज जाधव, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली सोनवणे, जिल्हा कार्याध्यक्ष विजय भालसिंग आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
ह.भ.प. रोहिदास महाराज जाधव जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या माध्यमातून अनेक वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. वारकरी संप्रदायात कार्यरत राहून माणुसकीच्या भावनेने त्यांनी दीन-दुबळ्यांची सेवा करुन आधार दिला आहे. तर अन्याय झालेल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्नशील आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात येत असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना ह.भ.प. रोहिदास महाराज जाधव यांनी राष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना स्थानिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. जिल्ह्यात तालुकास्तरावर संघटन उभे करुन वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी व सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून पुढाकार राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय महासचिव राजेंद्र मोरे यांच्यासह जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या राज्य कार्यकारणीच्या पदाधिकार्यांनी जाधव यांचे अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.