जिल्हा कमिटीवर एकमताने नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांची जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या जिल्हा कार्यााध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भालसिंग जागतिक मानवाधिकार फेडरेशनच्या नगर तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत असताना त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर यांनी भालसिंग यांच्या नियुक्तीची घोषणा केली. प्रभारी प्रदेशाध्यक्ष वाल्मीक महाराज जाधव यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. महाराष्ट्र प्रदेश युवा सचिव ह.भ.प. गोकुळ महाराज गांगुर्डे व महाराष्ट्र प्रदेश सचिव ज्ञानेश्वर महाजन माऊली यांनी या नियुक्तीबद्दल भालसिंग यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
वाळकी (ता. नगर) येथील विजय भालसिंग यांचे सामाजिक क्षेत्रात कार्य सुरु आहे. भालसिंग एस.टी. बँकेत कार्यरत असून, विविध उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक योगदान देत आहे. तर जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या नगर तालुकाध्यक्षपदी केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांची जिल्हा कमिटीवर कार्याध्यक्ष म्हणून एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे.
विजय भालसिंग यांनी संघटनेच्या माध्यमातून दीन-दलित व दुर्बल घटकांचे प्रश्न सोडवून आधार दिला जाणार असल्याचे सांगितले. या निवडीबद्दल नाशिकचे जिल्हाध्यक्ष डॉ. जनार्दन पगार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली सोनवणे, माजी तहसिलदार रोहिदास महाराज जाधव, महिला जिल्हाध्यक्षा ह.भ.प. हिराताई मोकाटे, शहर जिल्हाध्यक्ष संतोष बोर्हाडे, नेवासा तालुकाध्यक्ष प्रा. मंगेश महाराज वाघ, शेवगाव तालुकाध्यक्ष ह.भ.प. डॉ. जालिंदर महाराज निकम, महिला नगर तालुकाध्यक्षा प्रतिभा सांबळे यांच्यासह महाराष्ट्र कमिटीच्या पदाधिकार्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
