वंचितांच्या उध्दारासाठी संघर्ष करुन बाबासाहेब समाज परिवर्तनाचे महानायक ठरले -अमित काळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवकच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त जय भीमच्या गजरात मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी रिपाई युवकचे जिल्हाध्यक्ष अमित काळे, उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष शशिकांत पाटील, माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत ठोंबे, युवक जिल्हा सरचिटणीस दया गजभिये, युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रविण वाघमारे, युवक तालुका सरचिटणीस निखिल सुर्यवंशी, युवक तालुका उपाध्यक्ष विलास साळवे, युवक भिंगार शहराध्यक्ष महेश भिंगारदिवे, रोहित कांबळे, विक्रम चौहान, शैनेश्वर पवार, संदीप वाघचौरे, मयूर केदारे, आशिष पवार, अविनाश पवार आदी उपस्थित होते.
युवकचे जिल्हाध्यक्ष अमित काळे म्हणाले की, वंचितांच्या उध्दारासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संघर्ष करुन समाज परिवर्तनाचे ते महानायक ठरले. सामाजिक समतेसाठी विषमतेविरोधात तर न्यायासाठी अन्यायाविरोधात त्यांनी लढा दिला. शतकानुशतके वंचित असलेल्या समाजाला सन्मानाने जगण्याचा अधिकार त्यांनी मिळवून दिला असल्याचे, ते म्हणाले.
अजय साळवे यांनी समतेवर आधारित नवसमाजाचे स्वप्न बाबासाहेबांनी साकारले. अस्पृश्यता आणि जातीव्यवस्थेच्या अंधारात प्रकाशवाट निर्माण करुन त्यांनी न्याय प्रस्थापित केले. आजही समाज जाती व विषमतेच्या बंधनात अडकला जात असताना, या महामानवाच्या विचाराने बदल घडू शकणार असल्याचे त्यांनी सांगितले.
