फार्मासिस्ट दिनानिमित्त औषध निर्माते व औषध विक्रेत्यांचा सत्कार
थॅलेसमीयाच्या प्रतिबंधासाठी जनजागृती आवश्यक -संजय गुगळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील जनकल्याण रक्त केंद्र व जायंट्स ग्रुप ऑफ अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने थॅलेसेमिया आजार व रक्तदानाविषयी जनजागृतीसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जनकल्याण रक्त केंद्र येथे झालेल्या या कार्यशाळेत फार्मासिस्ट दिनानिमित्त औषध निर्माते व औषध विक्रेत्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यशाळेचे उद्घाटन करुन महानगरपालिका, बुथ हॉस्पिटल, सिव्हिल हॉस्पिटल व नगर मधील जेष्ठ फार्मासिस्ट यांचा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी जिल्हा केमिस्ट संघटनेचे संचालक संजय गुगळे, जायंट्स ग्रुपच्या अध्यक्षा विद्या तन्वर, अनिल गांधी, सिव्हिल हॉस्पिटलचे भाऊसाहेब सुडके, बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलचे अजय लोळगे, जयश्री म्हसे, वैशाली बागुल, पूजा शितोळे, जिल्हा रुग्णालयाचे दिलावर पठाण, सतीश मिसाळ, बुथ हॉस्पिटलचे अमित पठारे, विलास वाघमारे, केमिस्ट असोसिएशनचे संचालक राजूशेठ बेद्रे, आदेश जाधव, महेंद्र अनमल आदींसह फार्मासिस्ट उपस्थित होते.
संजय गुगळे म्हणाले की, कोणत्याही आजार व रोगापासून वाचण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय फायद्याचे ठरतात. जनकल्याण रक्त केंद्रात दरमहा शंभर रक्त पिशव्या थॅलेसेमिया रुग्णांना मोफत देण्यात येतात. दिवसेंदिवस हा आकडा वाढत चालला असून, थॅलेसमीयेच्या रुग्णसंख्या वाढत आहे. ही चिंताजनक बाब असून, थॅलेसमीयाच्या प्रतिबंधासाठी जनजागृती आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यशाळेत थॅलेसेमिया आजार व रक्तदानाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तर रक्ताचे प्रकार, प्लाझ्मा प्लेटलेट्स, लालपेशी या संदर्भातही मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेसाठी जनकल्याण रक्तपेढीचे संचालक सुधीर लांडगे, प्रशासकीय अधिकारी मुकेश साठे, अनघा चावरे, डॉ. गौरी जोशी, जनसंपर्क अधिकारी सोनाली खांडरे, सागर उंडे, शरद बळे, डॉ.विलास मढीकर, शंकर खंडागळे यांचे सहकार्य लाभले.

