शासनस्तरावर झालेल्या बैठकीत विविध प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन
सामाजिक न्याय विभाग, चर्मोद्योग व बार्टीच्या अधिकाऱ्यांसह चर्मकार विकास संघाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार समाजातील विविध प्रश्न सुटण्यासाठी नुकतीच चर्मकार विकास संघाच्या पुढाकाराने मंत्रालयात सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या अध्यक्षतेखाली तर चर्मोद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये व बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीसाठी चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, नगरसेविका आशाताई मराठे व राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी, महिला पदाधिकारी व अधिकारी वर्ग उपस्थित होते.

या बैठकीत संत गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीची महाराष्ट्रात शासकीय सुट्टी जाहीर करावी. जयंतीला शासनाकडून भरीव निधी द्यावा. सागर (मध्य प्रदेश) येथे शंभर कोटीचे संत रविदास मंदिर उभे राहत आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा संत रविदास महाराज यांचे विश्वविद्यापीठ स्थापन करण्यात यावे. चर्मउद्योग महामंडळाचे थकीत सर्व कर्ज सरसकट माफ करण्यात यावे. कर्जाची मर्यादा पंधरा लाखापासून 1 कोटीपर्यंत करण्यात यावी. नव्याने कर्ज वितरण करतांना सरळ पद्धतीने व जाचक अटी रद्द करावे सर्व कर्ज मंडळाच्या वतीने देण्यात यावे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात अद्यायावत संत रविदास विकास केंद्र उभारण्यात यावे. त्यात प्रशिक्षण केंद्र व संत रविदास महाराजांचे साहित्य व वाचनालय, अभ्यासिका अश्या विविध सुविधा युक्त समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता उपक्रम राबविण्यात यावे. कष्टकरी गटई कामगारांना आधुनिक दर्जाचे गटई स्टॉल देण्यात यावे अपघात विमा, आरोग्य विमा, घरकुल योजना पेन्शन योजना लागू करण्यात यावे. देवनार (मुंबई) येथील समाजाकरिता राखीव असलेली दहा एकर जागा ताब्यात घ्यावी व जागतिक दर्जाचे आधुनिक क्लस्टर व विक्री व्यवस्था करिता मार्केट हब, प्रशिक्षण केंद्र, निवासस्थान अशा सुविधायुक्त जागतिक दर्जाचे चर्म उद्योगाचे केंद्र उभारावे. बार्टी संस्थेमार्फत राबवल्या जात असलेल्या विविध योजनांचा लाभ गरजवंत युवकांना मिळावा अनेक भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडलेल्या बार्टीचा कारभार पारदर्शक करण्यात यावा, महाराष्ट्रात चर्मोद्योग वाढीसाठी छोटे-मोठे उद्योग उभारून नाममात्र व्याजासह युवा उद्योजकांना निधी उपलब्ध करून देण्यासह विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

झालेल्या बैठकीत सर्वच विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीसाठी मुंबई प्रदेश अध्यक्ष सुभाष मराठे, ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव घुमरे, प्रदेश कार्याध्यक्ष दिनेश माने, महिला प्रदेश कार्याध्यक्ष पूजा कांबळे, ज्येष्ठ नेत्या दिपाली चिपळूणकर, प्रदेश सहसंघटक राजेश साबळे, मुंबई प्रदेश सचिव राजनंदन चव्हाण, वधुवर समिती अध्यक्ष रामदास सोनवणे, अशोक कांबळे, महेंद्र साळवे, दीपक कांबळे, निलेश आहेर, संदीप आहेर, रविकिरण गवळी, राजाभाऊ शिंदे, भिकन जाधव, विलास भोळे, अशोक आगवणे, योगेश कांबळे, रविदासया फाउंडेशनच्या संचालिका पद्मजा राजगुरू, दिपाली कांबळे, यंकटराव दुढंबे, अंकुश जोगदंड, प्रा. गणेश कांबळे, सुखदेव काटकर, दिपाली दाभाडे-दळवे, अर्चना ईसलकर, संदीप डोळस, अरुण गाडेकर, दिनेश देवरे, सुभाष सोनवणे, ॲड. आदिनाथ बाचकर, हरदास बावस्कर, अहमदनगर जिल्हाध्यक्ष संतोष कानडे, संतोष सिमीलकर, गोपीचंद गुरव, राम कांबळे, प्रियांका गजरे, सविता बोबडे, जोशना लोकरे, रुपेश लोखंडे, सुवर्णा डोईफोडे, ॲड. आशा शिरसाट, विलास चौधरी, राजू गायकवाड, धरम गोविंद, आजिनाथ कांबळे, विजय शेळके, प्रभू पानझाडे, अविनाश यादव, अरुण कदम, गोपीचंद गुरव आदी महाराष्ट्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित पदाधिकारी यांनी विविध प्रश्न बैठकीत मांडले. यावेळी सुमंत भांगे यांनी समाजाला न्याय देण्याचे सामाजिक न्याय विभाग प्रयत्न करणार आहे. पुढील काळात सर्व प्रश्नांचे सोडूवणुक केले जाणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले. धम्मज्योती गजभिये व सुनिल वारे यांनी चर्मोद्योग महामंडळाच्या व बार्टीच्या नव्या योजना उपक्रमांची सविस्तर माहिती देऊन, लवकरच सर्व मागण्यांची सोडवणूक करण्याकरिता शासनस्तरावर प्रयत्न केले जाणार असल्याचे स्पष्ट केले. चर्मकार विकास संघाच्या वतीने मान्यवरांचा सन्मान संत रविदास महाराज यांची प्रतिमा भेट देऊन करण्यात आला. बैठकीचे सूत्रसंचालन संतोष कानडे यांनी केले.