पदाधिकार्यांच्या नियुक्त्या
श्रीरामपूर तालुकाध्यक्षपदी चांगदेव देवराय
अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांच्या अध्यक्षतेखाली श्रीरामपूर येथे बैठक घेण्यात आली. यावेळी श्रीरामपूर तालुकाध्यक्षपदी चांगदेव देवराय यांच्यासह इतर पदाधिकार्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी दादासाहेब कांबळे, भिमराव तेलोरे, अमोल डोळस, सचिन गाडेकर आदी उपस्थित होते.
सामाजिक कार्य करणार्यांना संघटित करुन समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी चर्मकार विकास संघ योगदान देत आहे. श्रीरामपूर तालुक्यासाठी नवीन पदाधिकार्यांची नियुक्ती करण्यात आले असल्याचे खामकर यांनी स्पष्ट केले.
चर्मकार विकास संघाच्या श्रीरामपूर तालुका उपाध्यक्षपदी रविंद्र गाडेकर, संघटक संतोष देवराय, युवा शहराध्यक्ष कर्णासाहेब कापसे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच वधुवर समितीच्या अध्यक्षपदी सुरेश भोसले यांना जबाबदारी देण्यात आली. तर 16ऑक्टोबर रोजी निशुल्क राज्यस्तरीय वधुवर पालक परिचय मेळावा घेण्याची घोषणा यावेळी सर्वानुमते करण्यात आली.मोठ्या संखेने वधुवर व पालकांनी या मेळाव्यात सहभागी होऊन संधीचा लाभ घेण्याचे अहवान करण्यात आले आहे. लवकरच श्रीरामपुर शहर व तालुका कार्यकारणीचा विस्तार करुन महिलांना विविध पदाच्या माध्यमातून कार्य करण्याची संधी दिली जाणार असल्याचेही खामकर यांनी सांगितले.
