अनेकांची उडाली धांदळ
व्हॉट्सअप डाऊनच्या मीम्सचा पाऊस
अहमदनगर (प्रतिनिधी)- चक्क काही तासांसाठी व्हॉट्सअॅप बंद पडल्याने अनेकांची धांदळ उडाली. मंगळवारी (दि.25 ऑक्टोबर) व्हॉट्सअॅपचे सर्व्हर डाऊन झाल्याने जगभरातील अनेक भागात मोठ्या तक्रारी युजर्सकडून प्राप्त झाल्या. मात्र व्हॉट्सअॅपवर येणार्या समस्येबाबत कंपनीने अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही.
अर्धा ते पाऊणतास भारतात व्हॉट्सअॅप डाऊन झाल्याने लाखो युजर्सला अडचणींचा सामना करावा लागला. ऐन दिवाळी सणात ही समस्या उद्भवल्याने अनेक युजर्सला शुभेच्छा देण्यास व्यत्यय आला होता. तर काही महत्त्वाच्या व कामाचे संदेश पाठविता येत नसल्याने अनेकांची त्रेधा तिरपीट उडाली.
मेसज पाठविण्यासाठी नागरिकांनी इतर सोशल मिडीयाचा आधार घ्यावा लागला. काही तासातच व्हॉट्सअॅप डाऊन असा हॅशटॅग ट्रेंड झाला होता. तर फेसबुक व ट्वीटरवर व्हॉट्सअप डाऊनच्या मीम्सचा पाऊस पडला.