• Thu. Oct 16th, 2025

कोरोनामुळे चीनसारखी भीषण परिस्थिती भारतात उद्भवणार नाही

ByMirror

Dec 31, 2022

भारतीयांची वाढलेली प्रतिकारशक्ती, उन्नतचेतना व आत्मविश्‍वास कारणीभूत असल्याचा दावा

हुकुमशाही विरोधात ग्लोबल वॉर्निंग कोरोना महामारीने दिली

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या नव्या प्रजातीतून चीनमध्ये मोठ्या संख्येने भीषण साथीच्या आजाराला लोक बळी पडत असून, कोरोनाने हाहाकार माजवला आहे. मात्र भारतात नागरिकांची वाढलेली प्रतिकारशक्ती व आत्मविश्‍वासाने चीन सारखी परिस्थिती भारतात निर्माण होणार नसल्याचा दावा पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेने केला आहे.

तर पिढ्यानपिढ्या हुकुमशाहीच्या गुलामगिरीत असलेल्या चीनच्या नागरिकांचा आत्मविश्‍वास हिरावला गेल्याने हा प्रकार घडत असून, एकप्रकारे हुकुमशाही विरोधात ग्लोबल वॉर्निंग कोरोना महामारीने दिली असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


तीन-चार पिढ्या हुकूमशाहीच्या गुलामगिरीमध्ये वावरल्यामुळे चीनी नागरिक उन्नतचेतना, प्रतिकार शक्ती व आत्मविश्‍वासपासून वंचित झालेले आहे. निसर्गाने प्रतिकारशक्तीचे दिलेले वरदान चीनच्या जनतेसाठी निकामी ठरत आहे. जो डर गया, वो मर गया… या मानसशास्त्रीय तत्वामुळे संपूर्ण चीन महामारीत सापडला आहे. परंतु भारतामध्ये लोकशाही असल्यामुळे या ठिकाणी आत्मविश्‍वास व प्रतिकारशक्ती मोठ्या प्रमाणात टिकून आहे. त्यामुळे भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव यापुढे होऊ शकणार नाही. कारण निसर्गाने दिलेले एपिजेनेटिक्स या शास्त्राचा वापर भारतामध्ये मागच्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणात झाला असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


मागच्या कोरोनामध्ये ज्यांच्याकडे मेडिक्लेम होता ते भितीने रुग्णालयात भरती झाले. अनेकांना भितीने जीव गमवावा लागला. परंतु ज्यांनी आत्मविश्‍वास टिकून ठेवला आणि प्रतिकारशक्ती वाढवली त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव काही एक करु शकला नाही. चीनवर आलेले संकट भारतावर अजिबात येणार नाही याची खात्री तमाम जनतेने बाळगली पाहिजे. प्रत्येकाने उन्नतचेतनेचा विकास, आत्मविश्‍वास व प्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजे. अन्यथा भारतात उपचाराच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार झाल्याशिवाय राहणार नसल्याचे अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे.

यासाठी संघटनेने ग्लोबल वॉर्निंगद्वारे कोरोना महामारीला कायमचा शह देण्यासाठी नागरिकांमध्ये जागृती करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, अर्शद शेख, डॉ. महेबुब सय्यद, प्रकाश थोरात, सुधीर भद्रे, ज्ञानदेव काळे आदी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *