• Sat. Sep 20th, 2025

केडगाव बायपास खुनाचा तपास त्वरित लावण्याची मागणी

ByMirror

Feb 27, 2023

समता परिषद व नेप्ती ग्रामस्थांचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती येथील प्रा. शिवाजी किसन (देवा) होले यांच्या खुनाचा तपास त्वरित लावण्याची मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व नेप्ती ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन सोमवारी (दि.27 फेब्रुवारी) सर्वपक्षीय शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना दिले.


यावेळी समता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अंबादास गारुडकर, जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, महानगर अध्यक्ष दत्ताभाऊ जाधव, तालुका अध्यक्ष रामदास फुले, शाखा अध्यक्ष शाहुराजे होले, नेप्तीचे उपसरपंच संजय जपकर, वसंतराव पवार, अंबादास पुंड, फारूक सय्यद, प्रा. एकनाथ होले, सदाशिव भोळकर, जालिंदर शिंदे, दादू चौगुले, राहुल गवारे, दत्ता कदम, सुरेश कदम, सत्तर सय्यद, अरुण होले, तुषार भुजबळ, सौरभ भुजबळ, राहुल भुजबळ, कुणाल शिंदे, तेजस नेमाने, सुभाष चौरे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, राष्ट्रवादीचे प्रा. माणिक विधाते, भाजपचे अभय आगरकर, सुवेंद्र गांधी, शिवसेनेचे संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, दिलीप सातपुते, संदेश कार्ले, किशोर डागवाले, जालिंदर बोरुडे, धनंजय जाधव, निखील शेलार, आनिल बोरुडे, भरत गारुडकर, अमित खामकर, दीपक खेडकर, संदीप दातरंगे, परेश लोखंडे, नितीन कदम, विनायक बेल्हेकर, बाबासाहेब जाधव, नितिन शिंदे, ओंकार बेल्हेकर, सलिम सय्यद आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


नेप्ती येथील प्रा. शिवाजी किसन (देवा) होले (सध्या रा. जाधव पेट्रोल पंम्प, नगर-कल्याण रोड) यांची केडगाव शिवारातील बायपास येथे गुरुवारी (दि.23 फेब्रुवारी) रात्री पिस्टलने गोळी घालून हत्या करण्यात आली. त्याचा तपास पोलीसांच्या वतीने सुरू आहे. परंतु या प्रकरणात आरोपींचा तपास लागला नसून, अद्याप कोणत्याही प्रकारे या गुन्ह्याच्या तपासाची प्रगती दिसून येत नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

या खून प्रकरणातील मारेकर्‍यांना लवकरात लवकर अटक करावी, प्रस्तावित केडगाव पोलीस स्टेशन लवकरात लवकर कार्यान्वीत करावे, रात्री पोलीसांची गस्त वाढवावी, रस्त्यावर पथदिवे व सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी शिष्टमंडळाने यावेळी केली. होले यांच्या दहाव्या पर्यंत मारेकरींचा शोध न लागल्यास ग्रामस्थांच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *