तर क्रीडांगणाचे भूमिपूजन
पारंपारिक शिक्षणाला अद्यावत शिक्षणाची जोड द्यावी -जालिंदर कोतकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील सरस्वती प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ई- लर्निंग क्लासरुमचे उद्घाटन व क्रीडांगणाचे भूमिपूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांचा शारीरिक व शैक्षणिक विकास साधण्यासाठी शाळेत ई- लर्निंग क्लास उभारण्यात आली असून, खेळाच्या मैदानाचे काम हाती घेण्यात आले आहे.

क्रीडांगण विकास योजनेतंर्गत पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून 7 लाख रुपये खर्च करुन क्रीडांगण उभारण्यात येत आहे. तर शाळेच्या वतीने ई- लर्निंग क्लासरुम सुरु करण्यात आली आहे. याचा शुभारंभ व भूमिपूजन उद्योजक जालिंदर कोतकर यांच्या हस्ते झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष दादारामजी ढवाण, भूषण गुंड, उद्योजक सागर सातपुते, बांधकाम व्यावसायिक जालिंदर पालवे, महावितरणचे इंजि. सांगळे, नगरसेवक मनोज कोतकर, संस्थेचे कोषाध्यक्ष धर्माधिकारी, समन्वयक डॉ. रविंद्र चोभे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोकराव पुंड, उपाध्यक्ष दत्ता जगताप, मार्गदर्शिका प्रमिला कारले, मुख्याध्यापक संदीप भोर, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मोहिनी धर्माधिकारी आदींसह शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक संदीप भोर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी ई- लर्निंग व क्रीडांगणाचे महत्त्व विशद करुन, शाळेने ई- लर्निंगसाठी नवनीतचे सॉफ्टवेअर देखील उपलब्ध केले असल्याची माहिती दिली. शाळेच्या सदर कामासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी जालिंदर कोतकर यांचे विशेष सहकार्य केल्याबद्दल त्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी कालानुसार बदलण्याची गरज आहे. पारंपारिक शिक्षणाला अद्यावत शिक्षणाची जोड द्यावी लागणार आहे. तर क्रीडांगणावर घडलेल्या विद्यार्थ्यांची सर्वांगीन प्रगती साधली जाणार असल्याची भावना जालिंदर कोतकर यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता खिलारी व अनिता क्षीरसागर यांनी केले. आभार शिवाजी मगर, अविनाश साठे यांनी मानले.