सावरकरांची ज्वाजल्य देशभक्ती आणि भाषेवरील प्रभुत्वाचा झाला उलगडा
मित्र मेळाचे इंजि. केतन सुहास क्षीरसागर आणि मित्र मेळा परिवाराचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- किर्तन व व्याख्यानातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची ज्वाजल्य देशभक्ती आणि भाषेवर असलेले त्यांचे प्रभुत्वाचा उलगडा करणारे कालजयी सावरकर कार्यक्रम शहरात रंगला होता. माऊली सभागृहात मित्र मेळाचे इंजि. केतन सुहास क्षीरसागर आणि मित्र मेळा परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. आमदार संग्राम जगताप व मंदारबुवा रामदासी गुरुजी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रीय किर्तनकार ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे, कार्यक्रमाचे आयोजक इंजि. केतन क्षीरसागर, श्रेणिक शिंगवी, तेजस अतितकर, रघुनाथ सातपुते, कौस्तुभ क्षीरसागर, मयुर रोहोकले, ऋषीकेश जोशी, सुदर्शन कुलकर्णी, राहुल वाणी, मंगेश जोशी, अनिकेत देओलगावकर, समीर पाठक, संकेत होशिंग, चंद्रकांत सैंदाने, आशुतोष मेनसे, गणेश लिमकर, अशोक अकोळकर, मयुर रोहोकले, निशिकांत महाजन, प्रशांत थोरवे, किरण पिसोरे, पुष्कर शुक्रे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात इंजि. केतन क्षीरसागर यांनी पाहुण्याचे स्वागत करुन, स्वातंत्र्यवीर सावरकरांची ज्वाजल्य देशभक्तीसह त्यांच्यातील कला-गुण युवकांपुढे येण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रीय किर्तनकार ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे यांनी भाषाप्रभू सावरकर या विषयावर व्याखानात सावरकरांना अवगत असलेल्या भाषा व भाषेवर असलेले त्यांचे प्रभुत्वावर त्यांनी प्रकाश टाकला.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्याकरिता मोठा लढा उभारला. त्यांच्या प्रेरणादायी जीवनपट उलगडण्यासाठी मित्रमेळाने घेतलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. सावरकरांचे विचार व कार्य देशभक्तांना स्फुर्ती देणारे असल्याचे त्यांनी सांगितले.
जयोस्तुते या गीतावर नृत्याच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला प्रारंभ झाले. ने मजसी ने परत मातृभूमीला! सागरा प्राण तळमळला… या या गीतांनी अक्षरश: अंगावर शहारे आणले. उत्कर्ष दगडे याने नृत्याचे सादरीकरण केले. तर ओंकार देओलगावकर यांनी गायन केले. कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाला रामकृष्ण कन्स्ट्रक्शन आणि श्रेणिक शिंगवीस शाईन अॅण्ड गोल्ड ज्वेलर्स प्रायोजकत्व लाभले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मित्र मेळा परिवार, नाट्य आराधना व समर्थ सत्संग परिवाराचे सहकार्य लाभले.