डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन वैद्यकीय, परिचर्या आणि फिजिओथेरपी महाविद्यालयाचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन वैद्यकीय, परिचर्या आणि फिजिओथेरपी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ई आरोग्य विज्ञानाचे परिवर्तन जागतिक परिषद उत्साहात पार पडली. एकवीसाव्या शतकात तंत्रज्ञानामुळे वैद्यकिय क्षेत्रात काळानुरूप होणारे बदल आणि या बदलाचा रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्यामध्ये मोलाच्या भूमिकेबाबत परिषदेत मार्गदर्शन करण्यात आले.
वैद्यकीय क्षेत्रातील झपाट्याने होणारे बदल हे अंगीकारून त्यांना आत्मासात करण्याची गरज निर्माण झाली आहे. वैद्यकीय आणि तंत्रज्ञानाची योग्य सांगड घालून आरोग्य सेवा पुरविण्यास मदत व्हावी या अनुशंगाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठचे(नाशिक) कुलगुरु तथा माजी लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर, वैद्यकिय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे (मुंबई) संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर हे होते.

परिषदेचे उद्घाटन कुलगुरु डॉ. माधुरी कानिटकर यांच्या व्हिडिओ संदेशाने झाले. त्या म्हणाल्या की, ई आरोग्य विज्ञान परिषदेचा विषय अचूक आणि काळाची गरज आहे. प्रथमच आरोग्या क्षेत्रातील तीन वेगळ्या विभागाची एकत्रित पद्धतीने परिषदेच्या आयोजनासाठी पुढाकार घेतल्याबद्दल आयोजकांचे त्यांनी कौतुक केले.
संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी या परिषदेच्या माध्यामातून विविध विषयांवर होणारी चर्चा आणि अद्यावत तंत्रज्ञानाची माहिती रूग्णसेवेसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे स्पष्ट केले. परिषदेचे संचालक डॉ. अभिजित दिवटे यांच्या हस्ते परिषदेची स्मरणिका (कॉन्फरन्स प्रोसिडिंग) चे ऑनलाईन प्रकाशन केले.
या परिषदेमध्ये आरोग्य सेवेमधील परिवर्तन, अलीकडच्या काळातील आरोग्य सेवेतील बदल, कृत्रिम बुद्धिमत्ता, वर्तमान काळातील आरोग्य सेवेत वापरण्यात येणारे आधुनिक उपकरणे, रोबोटिक्स, टेलिमेडिसिन, आभासी वास्तव, आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील बदल या विषयांवर अमेरिका, मस्कत, अबूधाबी आणि ओमान तसेच देशांतर्गत नोएडा, केरळ, आणि मुंबई येथील विविध क्षेत्रातील 12 तज्ञांनी उत्कृष्ट पध्दतीने मार्गदर्शन केले.
या परिषदेसाठी वैद्यकीय, फिजिओथेरपि आणि नर्सिंगच्या 667 लोकांनी सहभाग नोंदविला. यामध्ये तिन्ही विभागाच्या विविध भागातील पदवी, पदवीत्तर, पी.एच.डी विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकूण 117 शोधनिबांधचे सादरीकरण केले. परीक्षकांनी ऑनलाईन पद्धतीने मूल्यमापन केले. विजेत्यांचे अभिनंदन करून त्यांना ई प्रमाणपत्र देण्यात आले. या परिषदेची नोंद घेऊन महाराष्ट्र वैद्यकीय परिषदने 02, भारतीय उपचर्या परिषदे कडून 0.5 तर महाराष्ट्र परिचर्या परिषदे कडून 05 क्रेडिट पॉईंट देण्यात आले.
ही परिषद वैद्यकिय महविद्यालय अधिष्ठाता डॉ. सुनील म्हस्के, परिचर्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रतिभा चांदेकर, फिजिओथेरपि महाविद्यालयाचे डॉ. शाम गणवीर फिजिओथेरपि महाविद्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
परिचर्या महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. योगिता औताडे यांनी परिषदेची संपूर्ण माहिती देऊन आभार मानले.तसेच या परिषदेत साठी डॉ. सुवर्णा गणवीर, डॉ. दिपक आनप, डॉ. आरजीत दास, डॉ. प्राची आंचवले, डॉ. उर्मिला द्रविड, प्रा. निलेश म्हस्के, प्रा. अमोल टेमकर, प्रा. अमित कडू, डॉ. गोपाल यांनी परिश्रम घेतले.
संस्थेचे अध्यक्ष तथा महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. वि.वि.पा. फाऊंडेशनचे विश्वस्त व कार्यकारी अधिकारी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी परिषदेला शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.