• Thu. Oct 16th, 2025

आयटकची जिल्हा कार्यकारणी जाहीर

ByMirror

Dec 7, 2022

अध्यक्ष कॉ. उगले तर जिल्हा सेक्रेटरीपदी अ‍ॅड. टोकेकर यांची नियुक्ती

अहमदनगर (प्रतिनिधी)- आयटक कामगार संघटनेची बैठक भाकपच्या पक्ष कार्यालयात नुकतीच पार पडली. यामध्ये आयटकच्या अध्यक्षपदी अध्यक्ष कॉ. कारभारी उगले व जिल्हा सेक्रेटरीपदी अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर यांच्यासह इतर पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली.


आयटकची नूतन कार्यकारणी पुढील तीन वर्षासाठी 2025 पर्यंत निवडण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी कॉ. निवृत्ती दातिर, कॉ. सुरेश पानसरे, कॉ. सतिश पवार, सह सेक्रेटरीपदी कॉ. मारुती सावंत, कॉ. संजय नांगरे, कॉ. उषा अडानगळे, खजिनदारपदी कॉ. भारती न्यालपेल्ली यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा कार्यकारणीमध्ये जयवंत बोरुडे, वर्षा चव्हाण, कॉ. रावसाहेब शेलार, निर्मला खोडदे, कविता गिरे, जयश्री गुरव, बाळासाहेब लोखंडे, शरद भुजबळ, कन्हैय्या बुंदेले, सुवर्णा थोरात, स्मिता ठोंबरे, मनीषा डाम्भे, दत्तात्रय हांडे, सविता धापटकर, शारदा काळे, कॉ. विजय सोनवणे, सुप्रिया जाधव, सुषमा कपाटे, कॉ. विजय भोसले, उषा दिघे, विलास रासकर, कॉ. सगुणा श्रीमल, विठ्ठल खेडकर, निर्मला कहानडाळ, कॉ. संगीता कोंडा यांची निवड करण्यात आली.


आयटक कामगार संघटनेशी सर्व ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, लाल बावटा युनियन जनरल अवतार मेहेर बाबा ट्रस्ट, लाल गुर बुवा ट्रस्ट, आशा कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य पतसंस्था कर्मचारी, अहमदनगर जिल्हा पतसंस्था कर्मचारी संघटना, लाल बावटा बिडी कामगार युनियन संलग्न आहे. तर जिल्ह्यात संघटनेचे 8 हजार सभासद आहेत.


अ‍ॅड. सुधीर टोकेकर यांनी जिल्ह्यातील कामगारांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आयटकच्या माध्यमातून प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगून जास्तीत जास्त सभासद करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. या नूतन पदाधिकार्‍यांचे केंद्रीय आयटकचे कॉ. भालचंद्र कांगो, दामले, राज्य सेक्रेटरी श्याम काळे, कॉ. सुभाष लांडे यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *