सामाजिक कार्यकर्ते भिंगारदिवे यांचे बुधवारी उपोषण
अहमदनगर (प्रतिनिधी)- आमदार बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्षाचे शिक्षा ठोठावल्यामुळे त्यांची आमदारकी तात्काळ रद्द करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते पवन भिंगारदिवे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्यपालांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीसाठी भिंगारदिवे यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर बुधवारी (दि.29 मार्च) उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
आमदार बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने 8 मार्च 2023 रोजी दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तरीदेखील विधिमंडळ सचिवांनी त्यांची आमदारकी रद्द केलेली नसल्याचे भिंगारदिवे यांनी निवेदनात म्हंटले आहे. दोन वर्षाचे शिक्षा ठोठावल्यामुळे आमदार बच्चू कडू यांची आमदारकी तात्काळ रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. सदर आमदार विरोधात उपोषण करत असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून धोका असल्याने पोलीस संरक्षण मिळण्याची देखील मागणी त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.