अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील विधीज्ञ अॅड. तौसिफ मुश्ताक बागवान यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीचे आदेश सहाय्यक संचालक सरकारी अभियोक्ता आनंद नरखेडकर यांनी अॅड. बागवान यांना दिले.

अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये गेल्या अनेक वर्षापासून अॅड. तौसिफ बागवान वकिली करत होते. सर्वसामान्य कुटुंबातून आलेले बागवान यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण नगर शहरात झाले.
सन 2015 पासून ते वकिली करत आहे. अहमदनगर व पुणे येथे विविध महत्त्वपूर्ण खटले त्यांनी चालवले आहेत. त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाल्याने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.