डायरी आपल्या ज्ञान संपत्तीचे प्रतीक व्हावे -न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर लॉयर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या सन 2023 नवीन वर्षाच्या डायरीचे प्रकाशन प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्या हस्ते झाले. जिल्हा न्यायालयात झालेल्या डायरीचे प्रकाशन सोहळ्याप्रसंगी जिल्हा सरकारी वकील अॅड. सतीश पाटील, अहमदनगर शहर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. अनिल सरोदे, सेंट्रल बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. के.एम. देशपांडे, सोसायटीचे चेअरमन अॅड. नानासाहेब पादीर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

प्रास्ताविकात अॅड. नानासाहेब पादीर म्हणाले की, सोसायटीच्या नफ्यातून बोनस म्हणून वकील सभासदांना डायरीची भेट दिली जाते. ही डायरी वकिलांसाठी दैनंदिन कामकाजाकरीता उपयुक्त असून, यामध्ये नवनवीन खटल्यांचा उल्लेख, सभासदांचे संपर्क व नोट्सची सोय करण्यात आली आहे. वकीलांसाठी न्यायालयीन माहितीचा देखील यामध्ये समावेश असून, वकिलांच्या कामकाजाच्या दृष्टीने डायरी अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर सोसायटीला सलग पाच वर्ष अ वर्ग मानांकन मिळाले असल्याचे सांगून सोसायटीची माहिती दिली.

जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा म्हणाले की, अहमदनगर लॉयर सोसायटीने डायरीचा राबविलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. डायरी आपल्या ज्ञान संपत्तीचे प्रतीक व्हायला पाहिजे. डायरीमुळे दैनंदिन कामकाज करणे सोपे होते व महत्त्वाचे काम देखील आठवणीत राहतात. यामध्ये योगदान म्हणून स्वत: रेडी रेफरन्सच्या चार्ट उपलब्ध करुन देणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या कार्यक्रमात न्यायाधीश यार्लगड्डा यांच्या हस्ते ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. विश्वासराव आठरे, वकिल संघाचे माजी अध्यक्ष अॅड. भुषण बर्हाटे, अॅड. अशोक बार्शीकर, अॅड. लक्ष्मण कचरे, अॅड. अनुराधा येवले, अॅड. रविंद्र शितोळे, अॅड. आर.एम. संकलेचा, अॅड. फारुक बिलाल, अॅड. स्वाती नगरकर, अॅड. एकनाथ गुंजाळ, अॅड. विजय भगत, अॅड. सुभाष भोर, अॅड. रावसाहेब बर्डे, अॅड. बाबासाहेब रणसिंग, अॅड. संदीप वांढेकर, अॅड. एकनाथ गुंजाळ, अॅड. चेतन रोहोकले, अॅड. मंगेश सोले, अॅड. युवराज पाटील यांना प्रातिनिधिक स्वरुपात डायरीचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. सुधीर टोकेकर यांनी केले. आभार अॅड. रफिक बेग यांनी मानले. यावेळी सोसायटीचे संचालक अॅड.प्रभाकर शहाणे, अॅड. सुरेश कोहकडे, अॅड. स्वाती नगरकर, अॅड. सविता साठे-कराळे, अॅड. सुरेश ठोकळ, अॅड. चंद्रकांत शेकडे, अॅड. अरविंद मुळे, अॅड. बाळासाहेब गोफणे, लेखापाल, एल.आर. दंडवते, व्यवस्थापक अश्विनी पवार, एस.ए. घोलप, ए.ए. मुळे आदींसह वकील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.