अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील पाटबंधारे विभगाच्या अधीक्षक अभियंतापदी बाळासाहेब कचरू पाटील शेटे बदली होवून आले आहेत. पाटबंधारे प्रकल्पात बांधकामाचा प्रदिर्घ अनुभव असल्यामुळे त्यांच्या नियुक्तीने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प गुणवत्तापूर्वक व जलद गतीने मार्गी लावण्यासाठी मोठा उपयोग होणार आहे.
बाळासाहेब कचरू पाटील शेटे हे नांदेड जिल्ह्यात पाटबंधारे विभगाच्या सिंचन बांधकाम अधीक्षक अभियंतापदी कार्यरत होते. त्यांची नुकतीच बदली झाली असून, त्यांनी अहमदनगर पाटबंधारे विभगाच्या अधीक्षक अभियंतापदाची सूत्रे हाती घेतली आहे. पदभार घेतल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
मा. संपादक कृपया प्रसिध्दीसाठी……………….