• Thu. Oct 16th, 2025

अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाची नूतन कार्यकारणी जाहीर

ByMirror

Dec 12, 2022

अध्यक्षपदी आप्पासाहेब शिंदे तर सचिवपदी राजेंद्र खेडकर यांची नियुक्ती

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. संघाच्या अध्यक्षपदी शिक्षक नेते आप्पासाहेब शिंदे (नगर) तर सचिवपदी राजेंद्र खेडकर (श्रीगोंदा) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.


नगर-कल्याण रोड येथील जाधव लॉन येथे हरिश्‍चंद्र नलगे यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी चांगदेव कडू, मच्छिंद्र लगड, शिवाजी हरिश्‍चंद्रे, रामनाथ सुरुसे, बाजीराव कोरडे, राजेंद्र कोतकर, महेंद्र हिंगे, नंदकुमार शितोळे, उध्दव गायकवाड, विठ्ठल पानसरे, बबनराव लांडगे, बाळासाहेब भोर, अर्जुन भुजबळ, मंगेश काळे, छबुराव फुंदे आदींसह जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. अहवाल सालातील कामकाजाबाबत विचारविनिमय करून चर्चा करण्यात आली. शिक्षकांच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा करुन उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले.


अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी प्रशांत होन (श्रीरामपूर), राजेंद्र कोहकडे (राहता), संजय देशमाने (कर्जत), बाळकृष्ण चोपडे (संगमनेर), संभाजी गाडे (राहुरी), सहसचिवपदी रावसाहेब शेळके (अकोला), भाऊसाहेब जिवडे (नगर), दादासाहेब देशमुख (शेवगाव), आत्माराम दहिफळे (पाथर्डी), वाल्मिक रौंदाळे (कोपरगाव), खजिनदारपदी बाळासाहेब निवडूंगे (पारनेर), हिशोब तपासणीसपदी भरत लहाने (जामखेड), रावसाहेब चौधरी (नेवासा), आश्रमशाळा प्रतिनिधीपदी दत्ता जाधव (अकोले) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नवीन कार्यकारणी पुढील दोन वर्षासाठी राहणार आहे. या नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *