सूर्यास्ताच्या वेळी भारतीय लांडग्याचे छायाचित्रांची सिरीज पोहचली जागतिक स्तरावर
अहमदनगर (प्रतिनिधी)- 35 फोटो प्रो प्रोफेशनल फोटोग्राफी कंम्युनिटी (रशिया) यांनी नुकतेचे आयोजित केलेल्या 35 अवॉर्डस या आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, त्यामध्ये शहरातील ओंकार रविंद्र बेद्रे यांच्या छायाचित्रांचे सिरीज (9 छायाचित्रे) जागतिक स्तरावर तिसरा क्रमांक पटकाविला आहे.

या स्पर्धेमध्ये 174 देशातील 1 लाख 04 हजार 814 छायाचित्रकारांनी सहभाग घेतला होता. एकूण 4 लाख 45 हजार छायाचित्र सदर स्पर्धेसाठी प्रवेशिका म्हणून आल्या होत्या. या स्पर्धेचे परीक्षण जगातील 50 देशातील 50 नामांकित छायाचित्रकारांनी केले आहे.

या स्पर्धेमध्ये ओंकार यांनी काढलेला सूर्यास्ताच्या वेळी भारतीय लांडग्याचे छायाचित्रांची सिरीज जागतिक स्तरावर पहिल्या 35 छायाचित्रांच्या सिरीजमध्ये सामील झालेले असून, त्या सिरीजला जागतिक पातळीवर तिसरा क्रमांक मिळाला आहे. वरील स्पर्धेमध्ये दर वर्षी जगातील सर्वश्रेष्ठ 35 छायाचित्रांच्या सिरीज निवडतात आणि ह्या वर्षी स्पर्धेमध्ये भारतातील फक्त 4 छायाचित्रकारांचा समावेश असून त्यापैकी आपल्या अहमदनगरचा ओंकार जागतिक पातळीवर तिसर्या स्थानी आहे.

युवा वन्यजीव छायाचित्रकार ओंकार बेद्रे याने सलग चौथ्या वर्षी मिळविलेल्या यशामुळे अहमदनगरचे नाव जागतिक पातळीवर पुन्हा झळकले आहे.