अभ्युदय बँकेने शहरात व्यापार व उद्योगाला चालाना देऊन, गरजूंना नेहमीच मदतीचा हात दिला -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- अभ्युदय बँकेने आर्थिक पाठबळ देऊन शहरातील व्यापार व उद्योगाला चालना देण्याचे कार्य केले. तर सामाजिक उपक्रमातून गरजूंना नेहमीच मदतीचा हात दिला आहे. सर्वसामान्यांना आर्थिक पाठबळ मिळाल्याने त्यांचा विकास साधला गेला. सभासदांचे हित बघणारी बँक म्हणून नावलौकिक अभ्युदयने कमविला असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
अभ्युदय बँकेचा 59 वा स्थापना दिवस सावेडी येथील शाखेत उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमात आमदार जगताप बोलत होते. याप्रसंगी स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे, लोकनेते सितारामजी घनदाट सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय खामकर, सर्जेराव गायकवाड, सुभाष सोनवणे, शाखा व्यवस्थापक अनंत बकाल, विकास म्हस्के, अंतोन घनदाट, सचिन घनदाट, रामराव ज्योतिक, अरुण गाडेकर, श्रीपती ठोसर, मनिष कांबळे, दिनेश देवरे, अजय बोबडे आदी उपस्थित होते.
पुढे आमदार म्हणाले की, तळागळातील होतकरुंना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी माजी आमदार सितारामजी घनदाट यांनी अभ्युदय बँकेची स्थापना केली. त्यांच्या विचारांचा सामाजिक वसा घेऊन बँक वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगितले.
बँकेचे चेअरमन संदीप घनदाट यांनी बँकेची 59 वर्षाची वाटचाल सर्वसामान्यांना आधार देण्यासाठीच राहिली आहे.सामाजिक बांधिलकी ठेऊन बँकेचे कार्य सुरु आहे. कोरोनाच्या संकट काळात बँकेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 51 लाख रुपयाची मदत दिली. तर गुजरात व कर्नाटक राज्य सरकारला देखील प्रत्येकी 5 लाखाची मदत देण्यात आली. कोकण, चिपळून येथे पूरग्रस्तांना देखील मदत देण्यात आली. तर महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळातही 1 कोटीची आर्थिक मदत देण्यात आली होती. तर बँकेच्या माध्यमातून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम सुरु असते. बँकेचे सर्व ठेवीदार, भागधारक, सभासद यांचे हित व विश्वास जपून एक अग्रेसर बँके नावारुपास आली असून, बँकेबद्दलचा विश्वास सर्वाच्या मनामनात पोहोचला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.