• Sat. Sep 20th, 2025

हज यात्रेला जाणार्‍या जिल्ह्यातील भाविकांची वैद्यकीय तपासणी

ByMirror

May 16, 2023

523 भाविकांचा सहभाग

अहमदनगर (प्रतिनिधी)- हज कमिटीच्या वतीने पवित्र हज यात्रेला जाणार्‍या जिल्ह्यातील 523 भाविकांची मंगळवारी (दि.16 मे) जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. अहमदनगर जिल्हा हज कमिटी व जिल्हा रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आले.


या शिबिरासाठी हज कमिटीचे सलिम बागवान, हाजी अब्दुस सलाम, हाजी मन्सूर शेख, बाबा हाजी, तौसिफ शेख, अलीस सय्यद, सोहेल शेख, नगरसेवक आसिफ सुलतान, इमरान जहागीरदार, फारुक शेख, अल्ताफ सय्यद, डॉ. तांबोळी, डॉ. तांबे, डॉ. खान, डॉ. खालिद, डॉ. जाकीर आदी उपस्थित होते.
दरवर्षी मुस्लिम समाजातील भाविक पवित्र हज यात्रेसाठी सौदी अरेबियातील मक्का मदिना येथे जातात. तेथे जाण्यापूर्वी शासकीय रुग्णालयातून वैद्यकीय तपासणी करणे सक्तीचे असते. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


या शिबिरात हज यात्रेला जाणार्‍या भाविकांची सी.बी.सी., ब्लड शुगर, एक्स-रे, केएफटी व ईसीजी असे चार ते पाच वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. तर भाविकांना हेल्थ कार्डचे वाटप करण्यात आले. वैद्यकीय तपासणी शिबिरासाठी जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. सुमय्या खान, डॉ. साजिद तांबोळी, डॉ. हारुन शेख, डॉ. सचिन एकलहरे, डॉ. वैशाली बोठे, डॉ. मनिषा सोनवणे, लता वानेरे, मंगल होडगर, दिपाली पागीरे, तृप्ती मंडलिक, सुरेखा गायकवाड, वसिम शेख, संजय डहाणे, गणेश सासवडे, देवेंद्र भाबड यांचे सहकार्य लाभले. तसेच तांबोली मस्जिद मर्कज येथे हज यात्रेला जाणार्‍या भाविकांना रविवारी (दि.14 मे) हजच्या धार्मिक विधी व हज यात्रेची संपूर्ण माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *