• Sat. Mar 15th, 2025

स्वयंसेवी संस्थांच्या वतीने विजय भालसिंग यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

ByMirror

May 28, 2023

चांगले कर्म केल्यास जीवनात यशाचे फळ निश्‍चित -अ‍ॅड. सुरेश लगड

अहमदनगर (प्रतिनिधी)- चांगले कर्म व समाजाची सेवा केल्यास जीवनात यशाचे फळ निश्‍चित मिळते. प्रापंचिक जीवन जगताना आपण समाजाचे देणे लागतो, या उदात्त भावनेने कार्य करीत राहिल्यास समाज निश्‍चित दखल घेतो. निस्वार्थ भावनेने कार्य करणारे वाळकीचे सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांचे योगदान प्रेरणादायी व कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन विशेष जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. सुरेश लगड यांनी केले.


अहमदनगर शहराच्या स्थापना दिनानिमित्त गुलमोहर रोड येथील कोहिनूर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या जय असोसिएशन ऑफ एनजीओ (महाराष्ट्र राज्य) संलग्नित जिल्हाभरातील सामाजिक संस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विजय भालसिंग यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी अ‍ॅड. लगड बोलत होते. यावेळी जय असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. महेश शिंदे, शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, ह.भ.प. अ‍ॅड. सुनील महाराज तोडकर, काँग्रेसच्या सहसमन्वयक मंगलताई भुजबळ, शारदाताई लगड, लावणी सम्राज्ञी रोहिणी थोरात, भारतीय लोकशाही पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब काळे, नृत्य विशारद अनंत द्रविड, प्रा. सिताराम काकडे, जय असोसिएशनचे पोपट बनकर, संतोष गिर्‍हे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


ह.भ.प. अ‍ॅड. सुनील तोडकर महाराज म्हणाले की, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व आरोग्य क्षेत्रात विजय भालसिंग गेल्या दोन दशकापासून योगदान देत आहे. कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान व वर्गणी न घेता स्वखर्चातून सेवा करत आहे. गरजू-निराधार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, मंदिराचे जीर्णोध्दार, सार्वजनिक परिसर व बारवची स्वच्छता, वारकरी संप्रदायाचे संघटन, वृक्ष रोपण आदी विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत. त्यांच्या निस्वार्थ कार्याची दखल घेऊन जिल्ह्यातील सामाजिक संस्थांनी यावर्षीचा एकमेव जीवनगौरव पुरस्कार त्यांना प्रदान केल्याचे त्यांनी सांगितले.


अ‍ॅड. महेश शिंदे म्हणाले की, समाजाप्रती दातृत्व ठेवणे सर्वांना जमत नाही. मी व माझे कुटुंब यात बहुतांशी व्यक्ती गुरफटलेल्या असतात. भालसिंग यांनी चाकोरी बाहेर जाऊन वंचितांना आधार देण्याचे काम केले आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचा आदर्श घेऊन योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले.


मंगलताई भुजबळ यांनी समाजात काम करताना प्रचंड संघर्ष करावा लागतो. समाज हिताच्या कार्यात अनेक अडथळे आणले जातात. परंतु भालसिंग गेल्या वीस वर्षापासून अडथळ्यांची शर्यत पार करून समाजाला दिशा देण्याचे कार्य करीत असल्याचे सांगितले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भालसिंग यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी आरती शिंदे, अश्‍विनी वाघ, दिनेश शिंदे, बाबू काकडे, अशोक कासार, रावसाहेब मगर, रजनी ताठे, अनिल साळवे, विनोद साळवे, सलीम सय्यद, मीना म्हसे, अ‍ॅड. अनिता दिघे, प्रा. सुनिल मतकर, अ‍ॅड. पुष्पा जेजुरकर, डॉ. भास्कर रणनवरे, कांचन लद्दे आदींसह विविध स्वयंसेवी संघटनेचे प्रतिनिधी व विविध क्षेत्रात कार्यरत असलेले व्यक्ती उपस्थित होते.


सत्काराला उत्तर देताना विजय भालसिंग यांनी कोणत्याही प्रकारच्या पुरस्कार व सन्मानाची अपेक्षा न करता निस्वार्थपणे योगदान सुरु आहे. समाजाचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने आपल्या परीने योगदान दिल्यास अनेक प्रश्‍न सुटणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अ‍ॅड. भूषण बर्‍हाटे, अ‍ॅड. दिलीपराज शिंदे, अ‍ॅड. अनिता दिघे, दामोदर भालसिंग, वाळकीचे सरपंच शरद बोठे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस दिलीप भालसिंग, माजी सभापती रंगनाथ निमसे, कीर्तनकार दिलीप महाराज साळवे, एस.टी. बँकेचे अधिकारी, कर्मचारी व युनियनच्या पदाधिकारींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *