शम्स खान यांनी आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटविला -नईम खान
अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील सामाजिक कार्यकर्ते शम्स खान यांचा साई फ्लॉवर्सचे संचालक नईम खान यांनी सत्कार केली. कोठला येथील साई फ्लॉवर्स अॅण्ड डेकोरेशनच्या दालनात वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त झालेल्या या सत्कार सोहळ्यासाठी आवेज खान, शाहिद शेख, अली इरानी, माज बागवान, सुफियान खान आदी उपस्थित होते.

नईम खान म्हणाले की, मुकुंदनगरमध्ये शम्स खान यांनी आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटविला आहे. कोरोना काळातही त्यांनी सर्वसामान्य घटकातील नागरिकांना मोठा आधार दिला. त्यांचे वडिल हाजी समीर खान यांचा सामाजिक वारसा ते सक्षमपणे पुढे चालवत असल्याचे त्यांनी सांगितले. शम्स खान यांनी या घरगुती सत्कार सोहळ्याने भारावलो असल्याचे स्पष्ट केले.