• Mon. Dec 1st, 2025

समाज प्रबोधनाचे कार्य करणार्‍या महिला कीर्तनकारांचा सन्मान

ByMirror

Mar 8, 2023

महिला दिनानिमित्त अखिल विश्‍व वारकरी परिषदेचा उपक्रम

महिला कीर्तनकारांचे समाज जागृतीचे कार्य प्रेरणादायी -विजय भालसिंग

अहमदनगर (प्रतिनिधी)- अखिल विश्‍व वारकरी परिषदेच्या वतीने महिला दिनानिमित्त समाज प्रबोधनाचे कार्य करणार्‍या महिला कीर्तनकारांचा सन्मान करण्यात आला. तर वारकरी परिषदेच्या विविध पदांवर महिलांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.


वारकरी परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष विजय भालसिंग व जिल्हा अध्यक्ष साहेबराव पाचरणे यांच्या हस्ते महिला कीर्तनकार हिराताई मोकाटे यांना महिला जिल्हा कार्याध्यक्ष व महिला कीर्तनकार रंजनाताई शिंदे यांना महिला जिल्हाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी नगरसेविका सोनालीताई चितळे, सामाजिक कार्यकर्त्या सुरेखाताई सांगळे, संजना शिंदे, बेबीताई चौधरी, जनाताई वाकळे, अंगणवाडी शिक्षिका अनिताताई रोहकले, वाहतूक शाखेत कार्यरत महिला पोलीस पुष्पा सोनवणे आदी विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी वारकरी परिषदेचे जिल्हा सचिव कीर्तनकार दिलीप महाराज साळवे, जामखेड तालुकाध्यक्ष भीमराव मुरूमकर, जिल्हा सल्लागार दत्ताभाऊ वामन, बाळासाहेब बेल्हेकर, सुनिल सकट, पोपट कांडेकर आदी उपस्थित होते.


विजय भालसिंग म्हणाले की, महिला सर्वच क्षेत्रात आपले कर्तृत्व गाजवत आहे. धार्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला कीर्तनकारांचे समाज जागृतीचे कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

साहेबराव पाचरणे यांनी वारकरी परिषदेच्या महिला पदाधिकार्‍यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कीर्तनकार दिलीप साळवे म्हणाले की, वारकरी परिषदेच्या माध्यमातून धार्मिकतेला समाजकारणाची जोड देऊन कार्य सुरु आहे. संघटनेचे विचार व ध्येय धोरण पटल्याने महिला वर्ग देखील संघटनेला जोडल्या गेल्या असून, सामाजिक व धार्मिक कार्याला आनखी बळ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. नगरसेविका सोनालीताई चितळे यांनी वारकरी परिषदेच्या माध्यमातून सुरु असलेल्या कार्याचे कौतुक करुन या कार्यासाठी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *