• Mon. Jan 26th, 2026

संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

ByMirror

Aug 16, 2023

न्यायाधीश भाग्यश्री पाटील यांनी मुलींना चांगल्या व वाईट स्पर्शाची दिली माहिती

माझी माती, माझा देश अभियान अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षिस वितरण

अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील श्री लक्ष्मीनारायण शिशु शिक्षण मंदिर संचलित संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेत स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी विधी प्राधिकरणाच्या सचिव तथा न्यायाधीश भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.


या कार्यक्रमासाठी विशेष सरकारी वकील तथा बार संघटनेचे सचिव ॲड. सुरेश लगड, अंबिका महिला बँकेच्या चेअरमन ॲड. शारदाताई लगड, बार संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ शिर्के, ॲड. राजेश कावरे, पोलिस कॉन्स्टेबल भापकर, विकास कर्डीले, स्वप्नील सूर्यवंशी, दादा संस्थेचे विश्‍वस्त अरविंद धिरडे, सचिव गजेंद्र सोनवणे, खजिनदार संजय सागांवकर, शालेय शिक्षण समितीचे चेअरमन जितेंद्र लांडगे, सचिव विक्रम पाठक, बाबासाहेब वैद्य, सुनिल पावले, वनिता पाटेकर, छाया साळी, मुख्याध्यापिका कल्पना भामरे आदींसह शालेय शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


भाग्यश्री पाटील यांनी चांगला स्पर्श, वाईट स्पर्शचे महत्त्व समजवून सांगितले. मुलींना आपल्यावर होणारे अन्याय सहन न करता ते आपल्या आई-वडिल किंवा शिक्षकांना सांगण्याचे आवाहन केले. न्यायालयातील न्याय प्रक्रिया समजावून सांगितली.


कार्यक्रमासाठी 6 वी ते 9 वी च्या विद्यार्थ्यांनी परेड करून राष्ट्र ध्वजाला सलामी दिली. माझी माती, माझा देश अभियान अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे पाहुण्यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. उपक्रमशील शिक्षका चंदा कार्ले यांनी ध्वजारोहण कार्यक्रमाची माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र गर्जे व जगन्नाथ कांबळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शालेय शिक्षकांनी परिश्रम घेतले. आभार सुशिलकुमार आंधळे व मुख्याध्यापिका कल्पना भामरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *