शालेय राष्ट्रीय खेळाडूने मिळविला प्रथम क्रमांक
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील राळेगण येथील श्रीराम विद्यालयाने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली. गेल्या सोळा वर्षात पंधरा वेळा विद्यालयाचा निकाल शंभर टक्के असून विद्यालयाने जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेत निकालात अव्वल स्थान कायम राखले आहे. श्रीराम विद्यालयाने क्रीडा क्षेत्रात संस्थेत सर्वाधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवले असून गुणवत्तेतही विद्यालय आघाडीवर आहे.
श्रीराम विद्यालयाचे 36 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. पैकी 31 विद्यार्थी हे विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयाचे गुणवंत विद्यार्थी प्रथम क्रमांक- राष्ट्रीय खेळाडू महांडुळे जय संजय (94.80 टक्के), द्वितीय क्रमांक- भापकर श्रृतिका सुधीर (92.60 टक्के), तृतीय क्रमांक- कोळेकर पूनम मंजाबापू (92.40 टक्के), कुंजीर शुभांगी बाबासाहेब (92.20 टक्के), साळवे श्वेता संतोष (92.20 टक्के), हराळ अस्मिता अमृतराव (91.60 टक्के), पिंपळे प्राची विकास (90.20 टक्के), कोतकर संकेत अरुण (90.20 टक्के), गोडसे ऋतुजा गणपत (90.00 टक्के). या विद्यार्थ्यांना सुरेश बोठे, बाळासाहेब पिंपळे, विजय जाधव, राजेंद्र कोतकर, हरीभाऊ दरेकर, निळकंठ मुळे यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे, उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी.डी. खानदेशे, सहसचिव अॅड. विश्वासराव आठरे, खजिनदार डॉ. विवेक भापकर, विश्वस्त मुकेशदादा मुळे, विद्यालयाच्या मुख्याधापिका तारका भापकर, गावचे सरपंच सुधीर पाटील भापकर, मा.उपसरपंच अनिल पिंपळे, संजय भापकर, राजश्री जाधव, सुजय झेंडे, अरविंद कुमावत, रामदास साबळे, बाळासाहेब कुताळ, गोरक्ष हराळ, आदिनाथ खराडे, सुनिल पिंपळे, रमेश साळवे, बाळू चिरके, पांडूळे मेजर, विजय कोतकर, अशोक भापकर, ज्ञानेश्वर पिंपळे, मंजाबापू कोळेकर, आप्पा पिंपळे, आदिनाथ हराळ, बाबासाहेब हराळ,ग्रामस्थ व पालकांनी अभिनंदन केले.