रिपाई मराठा आघाडीची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातून विविध प्रश्न घेऊन येणार्या सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयातील अधिकार्यांना भेटण्याची वेळ सकाळच्या सत्रात ठेवण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) मराठा आघाडीच्या वतीने मराठा आघाडीचे राज्य संघटक सिध्दार्थ सिसोदे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

अहमदनगर जिल्हा हा भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठा जिल्हा आहे. शहरातील प्रमुख कार्यालयमध्ये जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून रोज येणार्या सर्वसामान्यांची मोठी संख्या आहे. जिल्हा कार्यातील प्रमुख अधिकार्यांना सर्वसामान्य लोकांना भेटण्याची वेळी दुपारनंतर आहे. यामुळे येणार्या सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होते.
सर्वसामान्य लोक शासकीय कार्यालयात अधिकार्यांना भेटण्यासाठी सकाळीच आलेली असतात. दिवसभर कार्यालयात बसून राहतात, दुपारनंतर उशिरा अधिकार्यांची भेट होते. अनेक जणांची परतीची गाडीची वेळ हुकते. त्यामुळे अनेक जणांना मनस्ताप सहन करावा लागतो. शासकीय अधिकार्यांच्या कार्यालयीन कामकाजाच्या बैठका दुपारनंतर घ्याव्यात व सकाळी जिल्ह्यातून अडीअडचणी सोडविण्यासाठी आलेल्या सर्वसामान्य लोकांना प्राधान्य देऊन त्यांची भेट घेऊन प्रश्न सोडविण्याची मागणी रिपाई मराठा आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.